1. पशुधन

lumpy disease: पशुपालकांनो सावधान! हजारो जनावरे लम्पी आजाराच्या विळख्यात

lumpy disease: देशात २ वर्षांपूर्वी कोरोना महामारीने थैमान घातले होते. यामध्ये लाखो लोकांचे जीव गेले. मात्र माणसाबरोबर जनावरांनाही साथीचा रोग आला आहे. यामध्ये जनावरे मरण्याची संख्या वाढत आहे. लम्पी रोगाने देशातील पशुपालकांची चिंता वाढवली आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
lumpy disease

lumpy disease

lumpy disease: देशात २ वर्षांपूर्वी कोरोना महामारीने थैमान घातले होते. यामध्ये लाखो लोकांचे जीव गेले. मात्र माणसाबरोबर जनावरांनाही (Animal) साथीचा रोग (Epidemic disease) आला आहे. यामध्ये जनावरे मरण्याची संख्या वाढत आहे. लम्पी रोगाने देशातील पशुपालकांची Cattle breeder) चिंता वाढवली आहे.

वाशीम (Washim) जिल्ह्यातील वाकद परिसरात लम्पी आजाराची अनेक जनावरांना लागण झाली आहे. तसेच एका बैलाचाही मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या रोगावर प्रभावी उपाययोजना (Effective measures) करण्याची मागणी पशु संवर्धन विभागाकडे (Department of Animal Husbandry) करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील शेकडो जनावरे लम्पी सारख्या साथीच्या रंगाच्या विळख्यात अडकली आहेत. शेतकरी श्रीराम देशमुख यांच्या बैलाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी या रोगावर काही तरी पर्याय काढून पशुपालकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.

Tata Motors: टाटा मोटर्स सीएनजी कारसह अनेक गाड्यांवर देत आहे बंपर सूट; जाणून घ्या सविस्तर

वाकद परिसरात लम्पी सारख्या आजाराने थैमान घातल्याने अनेक जनावरे बाधित झाली आहेत. त्यामुळे इतर जनावरांना वेगळे ठेवावे लागत आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद वानखेडे यांनी गोठ्यात आणि जनावरे स्वच्छ ठेवण्याचे आव्हान केले आहे.

पशुसंवर्धन विभाग उपाययोजनांसाठी तत्पर आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये असेही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे डॉ. विनोद वानखेडे यांनी म्हंटले आहे. पशुपालकांनी जनावरांची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

संकटांची मालिका संपेना! शेतकऱ्यांची चिंता वाढली, सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला

महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये लम्पी आजाराचा प्रभाव पाहायला मिळत आहे. इतर जिल्ह्यातही त्याचा प्रसार होतोय.लसीकरणाचे औषध उशिरा पोहचलं. त्यामुळं लम्पी आजार वाढण्याचा धोका निर्माण झालाय. राज्यातील पशुवैद्यक सतर्क झाले आहेत. राज्यात लसीकरण करण्यात येतंय.

तरीही लम्पी आटोक्यात आणण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागासमोर आहे. उत्तर प्रदेशात लम्पी या आजारानं 115 जनावरं दगावली. 17 लाख जनावरांचं लसीकरण करण्यात आलं. याचा धसका राज्यातील पशुसंवर्धन विभागानं घेतला.

महत्वाच्या बातम्या:
दिलासादायक! तेलबियांचे उत्पन्न वाढले, मोहरीच्या उत्पादनात 29 टक्क्यांनी वाढ, आता दर होणार कमी
कच्चा तेलाच्या किमती घसरल्या! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय झाला बदल? जाणून घ्या शहरातील नवे दर...

English Summary: Lumpy disease: Thousands of animals are suffering from lumpy disease Published on: 08 September 2022, 10:29 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters