सध्या कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी रोगाचा पुन्हा प्रादुर्भाव होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यात लम्पीग्रस्त जनावरे आढळली आहेत.
यामुळे येणाऱ्या काळात हा आकडा वाढू नये यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत. याठिकाणी ३० ते ४० जनावरे आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तातडीने पावले उचलत लसीकरणाची मोहिम राबवण्याचे काम सुरू केले आहे.
जिल्ह्यातील काही तालुक्यात ३० ते ४० जनांवरांना लम्पीची लागण झाली आहे. यावर तातडीने उपचार म्हणून जनावरांचे लसीकरण पूर्ण करत आहोत. आतापर्यंत १ लाख ४१ हजार डोस जिल्ह्यात पुरविण्यात आले आहेत.
'सरकारचा एक दिवस बळीराजासाठी, बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी'
यादृष्टीने ज्या भागात रोगाचा प्रादुर्भाव आहे तेथून जवळपास ५ किमीपर्यंत जनावरांचे पहिल्यांदा लसीकरण केले जाणार आहे. आपल्या जनावरांना कोणताही त्रास होत असल्यास जिल्ह्यातील पशुपालकांनी ताबडतोब आरोग्य केंद्रात माहिती द्यावी.
जनावरांचा संतुलित आहार, जाणून घ्या ते बनवण्याची संपूर्ण पद्धत आणि फायदे
यामुळे जनावरांना योग्य तो उपचार पोहोचण्यास मदत होणार आहे. दरम्यान लम्पीची साथ आली आहे, परंतु मागच्या वेळीसारखी त्याची तीव्रता कमी आहे. यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
किती साखर विकली? केंद्राने साखर कारखान्यांना मागितला अहवाल...
हळद 15 हजार पार, आवक झाली कमी..
खतांच्या किमतीवरून विधानसभेत राडा
Share your comments