1. बातम्या

किती साखर विकली? केंद्राने साखर कारखान्यांना मागितला अहवाल...

केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांकडे जुलै महिन्यातील साखरेच्या कोट्याविषयीची माहिती मागवली आहे. केंद्राने दिलेल्या पत्रात ही महिती तत्काळ सादर करण्याचे पत्र सर्व साखर कारखान्यांना देण्यात आले आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
sugar was sold (image google)

sugar was sold (image google)

केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांकडे जुलै महिन्यातील साखरेच्या कोट्याविषयीची माहिती मागवली आहे. केंद्राने दिलेल्या पत्रात ही महिती तत्काळ सादर करण्याचे पत्र सर्व साखर कारखान्यांना देण्यात आले आहेत.

कारखान्यांना केंद्र सरकारकडून साखर विक्रीसाठी कोटा निश्चित करून दिला जातो. या कोट्यानुसार देशांतर्गत या साखरेची विक्री करण्याची परवानगी दिली जाते. यावर केंद्राचे लक्ष असते.

यासाठी महिन्याच्या प्रारंभीच कारखान्यांकडून साखर विक्रीच्या निविदा काढल्या जातात. निविदा मंजूर झाल्यानंतर ठेकेदार त्याच्या सोयीनुसार तितक्या साखरेची उचल करतो.

मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप, शेडनेट यांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढा, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश

याबाबत माहिती २० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याची पत्रात माहिती देण्यात आली आहे. देशांतर्गत साखर विक्रीसाठी ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे दरमहा साखर विक्री करण्याची कारखान्यांना मुभा आहे.

कारखान्यांनी जादा साखर विक्री केल्याचा संशय आल्याने केंद्र सरकारने माहिती मागवल्याची चर्चा आहे. यामुळे येणाऱ्या काळात काही बदल देखील दिसण्याची शक्यता आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १४ वा हफ्ता कधी जमा होणार? अखेर तारीख आली समोर..

दरम्यान, केंद्रिय वाणिज्य मंत्र्यालयाकडून साखर कारखान्यांकडे जुलै महिन्यातील साखरेच्या कोट्याविषयीची माहिती मागवली आहे. ही माहिती पुढील महिन्यातील साखर कोटा ठरवून देण्यासाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

जनावरांचा संतुलित आहार, जाणून घ्या ते बनवण्याची संपूर्ण पद्धत आणि फायदे
'सरकारचा एक दिवस बळीराजासाठी, बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी'
ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारी कर्ज कसे घ्यायचे? सर्वकाही जाणून घ्या..

English Summary: How much sugar was sold? Center asked for report from sugar mills... Published on: 20 July 2023, 09:14 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters