शेतकरी वर्ग शेती(farming) बरोबर पशुपालन हा व्यवसाय करत असतो. पावसामुळे मनुष्यबरोबरच जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. घाणीमुळे, साचलेल्या पाण्यामुळे विविध प्रकारचे रोग आणि आजार पसरत आहे याचा धोका मनुष्य आणि जनावरांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.गेल्या 15 दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी लंम्पी या आजारावर जास्त चर्चा होताना समजत आहेत. या आजारामध्ये गुरांच्या अंगावर तसेच संपूर्ण शरीरावर गाठी निर्माण होतात आणि त्यामुळं सर्वात मोठं नुकसान हे दुभत्या जनावराचे आहे. कारण जर हा आजार दुभत्या गाई ला झाला तर दुधाचे उत्पादन हे कमी होते.
नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याच गावात लंम्पी या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. हा। एक संसर्गजन्य आजार आहे आणि हा आजार जलद गतीने कमी वेळात पसरत चालला आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात गुरांना लस द्यायला सुरुवात केली आहे. Lamping हा एक संसर्गजन्य आजार आहे हा आजार झाल्यावर त्वचेवर गाठी येत आहेत. आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात 2 लाख पेक्षा जास्त जनावरांचे लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळं जनावरांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
जाणून घ्या, कशामुळे होतेय लंम्पी रोगाची लागण?
शेतीबरोबरच आपण पशुपालन करतो परंतु आपण जनावरे आणि आपली जमीन यांच्यावर काहीच जास्त लक्ष्य देत नाही. जनावरांना हा आजार आपल्याच हलगर्जी पणा मुळे होत आहे. जनावरांचा गोठा साफ किंवा स्वच्छ नसल्याने जनावरांच्या गोठ्यात गोचिड, माश्या, टिक्स होतात. यामुळेच जनावरांना लंम्पी आजाराची लागण होते. गोचिड किंवा चावणाऱ्या माशा यामुळे जनावरंच्या अंगावर गाठी किंवा मोठमोठे फोड येतात व त्यामध्ये पू सुद्धा होतो.
नंदुरबार जिल्ह्यात पूर्ण केलेलं लसीकरण:-
- नंदुरबार तालुका 39 हजार 144
- अक्कलकुवा तालुका 30 हजार 439
- शहादा तालुका 40 हजार 600
- नवापूर तालुका 65 हजार 513
- धडगाव तालुका 35 हजार 500
- तळोदा तालुका 27 हजार 300
Share your comments