गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात लम्पी आजारामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यामुळे जनावरांचे बाजार देखील बंद ठेवण्यात आले आहेत. गेले चार महिने झाले जनावरांचा बाजार बंद केला आहे.
शासनाने महाराष्ट्रात (maharashtra) लम्पी आजाराच प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी जनावरांचे बाजार बंद ठेवले आहेत. सांगलीतील मिरजेतील दुय्यम बाजार समितीत भरणारा बाजार हा सगळ्यात मोठा समजला जातो.
असे असताना हा बाजार बंद आहे. हा बाजार बंद असल्याने महाराष्ट्रसह कर्नाटक या राज्यांतील गाई, म्हैशी, बकरी पालन जोड धंदा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उदरनिर्वहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे कोटींची उलाढाल बंद आहे.
ऊस शेती परवडणार! पठ्याने काढले 50 गुंठ्यांत थेट 120 टन ऊसाचे उत्पादन, वाचा शेतकऱ्याच व्यवस्थापन
यामुळे ही बाजारपेठ लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे. हा बाजार सुरू करण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत. सरकारने वडगाव बारामती या ठिकाणचे म्हशीचे बाजार सुरू केले आहेत.
राज्यात 5 हजार बायोगॅस उभारणार, अनुदानात झाली वाढ
यामुळे मिरजेचाही म्हैस बाजार सुरू करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महादेव कोरे यांनी केली आहे. हे बाजार लवकर सुरू केले नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या;
एकरी 140 टन उसाचे उत्पादन! कृष्णाच्या युवा शेतकऱ्याची कमाल
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या केबलवर मारला जातोय डल्ला..
राज्यात 5 हजार बायोगॅस उभारणार, अनुदानात झाली वाढ
Share your comments