पशुपालन व्यवसाय करत असताना जनावरांकडे विशेष लक्ष पुरविण्यात फार गरजेचे असते. दुधाचे वाढीव उत्पादन हे शेतकऱ्यांचे प्रमुख आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत असते. परंतु चुकीच्या आहार व्यवस्थापन आणि जनावरांना होणारे काही आजार याचा विपरीत परिणाम दूध उत्पादनावर होतो.
एखाद्या आजाराच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन घटू शकते, त्यामुळे पशुपालकांनी जनावरांना होणाऱ्या आजारांवर विशेष लक्ष केंद्रित करून आजार होऊ नये यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे. या लेखात आपण अशाच एका आजाराबद्दल जाणून घेणार आहोत. या आजाराचा प्रादुर्भाव जे जनावरे जास्त दूध देतात अशा जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.
'लेप्टोस्पायरोसिस' एक गंभीर आजार
जर आपण या आजाराच्या एकंदरीत प्रादुर्भाव याचा विचार केला तर जनावरांना खायला देण्यात येणारा चारा आणि पिण्याचे पाणी यावर जर आजारी जनावरांचे मुत्र किंवा गर्भाशयाचा स्त्राव पडला तर या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
या आजाराचे एक वाईट वैशिष्ट्य म्हणजे या आजाराने प्रादुर्भावित जनावराच्या मुत्राच्या माध्यमातून जवळजवळ चाळीस दिवसांपर्यंत या रोगाचे जंतू बाहेर पडत असतात.
या आजाराचे जास्त प्रादुर्भाव होण्याचे ठिकाणे
1- जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी किंवा पाणथळ जागा किंवा ज्या ठिकाणी पाणी साचून राहते अशा ठिकाणी जास्त प्रादुर्भाव होतो.
2- काही ठिकाणी हवेच्या आद्रतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा ठिकाणी देखील या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
नक्की वाचा:Murghaas Tips:मुरघास बनवा 'अशा' पद्धतीने, टिकेल जास्त दिवस आणि जनावरे राहतील निरोगी
3- उंदीराच्या शरीरामध्ये या आजाराचा जिवाणू सुप्तावस्थेमध्ये बरेच दिवसापर्यंत टिकून राहतात ऊंदिरांच्या मलमूत्र द्वारे आजार झपाट्याने पसरतो.
4- गाभण असणाऱ्या जनावरांच्या गर्भधारणेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात असलेल्या जनावरांमध्ये या आजारामुळे गर्भपाताचे समस्या मोठ्या प्रमाणात दिसते.
प्रतिबंधात्मक उपाय
या आजाराचा प्रादुर्भाव वा हा आजार होऊच नये यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोठ्यामध्ये घुस आणि उंदीर यांचा प्रादुर्भाव होऊ नये याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. जनावरांच्या अंगावर थोडी जखम झाली तरी पटकन त्यावर उपचार करावेत. काही लक्षणे दिसत असल्यास पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
नक्की वाचा:Prawn Fish Farming व्यवसायातून मिळेल लाखोंची कमाई, अशा पद्धतीने सुरू करा हा व्यवसाय
Share your comments