1. पशुधन

पशु आहारासाठी उत्तम असलेल्या लसूणघास / मेथीघास लागवडिविषयी संपूर्ण विश्लेषण

● लसूणघासामध्ये प्रथिनांचे प्रमाण 17 - 20% असते. त्याच बरोबर क्रूड प्रोटिन्स, मिनरल्स, विटॅमिन ए, विटॅमिन डी इ. घटक सामावलेले असतात. म्हणून लसूणघासास ' चारा पिकांचा राजा ' असे संबोधले जाते. घासामध्ये डायजेस्टेबल क्रूड प्रोटीनचे प्रमाण 15.9% तसेच C. 1.25.5 इ. विविध घटकांची टक्केवारी आढळून येते. ● लसूणघासाची उपयुक्तता विविध अंगी पहावयास मिळते कारण त्याचा हिरवा चारा म्हणून वर्षभर पुरवठा होऊ शकतो. त्याच प्रमाणे वाळलेल्या अवस्थेतील अवशेष सुद्धा जनावरांना उपयुक्त ठरतात. लसूणघासाचे पीक हे जमिनीची सुपिकता वाढविण्याचे काम करतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
lasunghaas

lasunghaas

  • लसूणघासामध्ये प्रथिनांचे प्रमाण 17 - 20% असते. त्याच बरोबर क्रूड प्रोटिन्स, मिनरल्स, विटॅमिन ए, विटॅमिन डी इ. घटक सामावलेले असतात. म्हणून लसूणघासास ' चारा पिकांचा राजा ' असे संबोधले जाते. घासामध्ये डायजेस्टेबल क्रूड प्रोटीनचे प्रमाण 15.9% तसेच C. 1.25.5 इ. विविध घटकांची टक्केवारी आढळून येते.

 

  • लसूणघासाची उपयुक्तता विविध अंगी पहावयास मिळते कारण त्याचा हिरवा चारा म्हणून वर्षभर पुरवठा होऊ शकतो. त्याच प्रमाणे वाळलेल्या अवस्थेतील अवशेष सुद्धा जनावरांना उपयुक्त ठरतात. लसूणघासाचे पीक हे जमिनीची सुपिकता वाढविण्याचे काम करतात.

 

  • लागडवडीसाठी जमिन

लसूणघासाचे पीक हे वेगवेगळ्या जमिनीत घेता येते. अगदी मध्यम प्रतिच्या, वाळूमिश्रित जमिनीपासून ते काळ्या कसदार जमिनी पर्यंतच्या भिन्न प्रकारात या पिकांची लागवड केली जाते. भारी जमिन या पिकास अत्यंत उपयुक्त ठरते. निचरायुक्त जमिन यासाठी गरजेची असते.

 

  • थंड व कोरड्या हवामानाच्या भागात हे पीक कमी जास्त प्रमाणात वाढीस लागते.

 

  • एकदा पेरणी केल्यानंतर हे पीक त्याच जमिनीत 3 ते 4 वर्षे राहत असल्याने पुर्व मशागतीला फार महत्व आहे त्यासाठी खोलवर नांगरट करून ढेकळाचे प्रमाण अधिक असल्यास ती फोडून घेऊन उभ्या - आडव्या कोळवाच्या पाळ्या दाखव्यात. बी पेरणीपुर्वी मध्यम ते हलक्या जमिनीत एकरी 8 ते 10 टन पुर्ण कुजलेले शेणखत घालावे.

 

  • हे पीक वार्षिक व बहुवार्षिक अशा दोन्ही प्रकारात घेतले जाते.

 

  • लसूणघासाची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत करणे फायदेशीर ठरते. एकरी सर्वसाधारण 10 किलो बी पुरेसे होते.

 

  • बी फेकूनही लसूणघास लागवडीखाली आणता येतो. लसूणघासाच्या सुधारीत जाती सिरसा 9, स्थानिक, पुन 1 बी, ल्युसर्न 9, आर. एल. 88, आनंद 2, आनंद 3 इ. आहेत.

 

  • लसूणघासाच्या चांगल्या उत्पादनासाठी पेरणीपुर्वी वर सांगितल्या प्रमाणे सेंद्रीय खताचा वापर करावा. नत्र देण्याची विशेष गरज नाही. वर्षानुवर्ष लसूणघासाचे पीक चाय्रासाठी मुबलक पणे झाल्यास दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पालाश 40 किलो म्हणजेच लसूणघासाचे उत्पादन वाढीस लागते. तसेच जमिनीचा पोत देखील सुपीक राहण्यास मदत होते. माती परीक्षण अहवालानुसार खत मात्रा द्यावी.

 

  • लसूणघासाचे पीक हे वर्षभर हिरवा चारा पुरविणारे पीक असल्याने पाणी पुरविण्याची सोय वेळच्यावेळी करणे अतिशय महत्त्वाची असते.

 

  • लसूणघासाला 10 ते 15 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजेत. उन्हाळ्यात 8 - 10 दिवसांनी तर हिवाळ्यात 10 - 12 दिवसांनी जमिनीजमिनीच्या गरजेनुसार पाणी द्यावे.

 

  • लसूणघास दुभत्या जनावरांना खायला दिल्याने दुधाचे प्रमाण वाढते व त्यातील स्निग्धांशाचेही प्रमाण वाढते.

 

  • लसूणघासाचे पीक प्रथम कापणीस साधारणपणे 45 ते 50 दिवसात येते. फुलोय्रात येण्यापुर्वीच लसूणघासाची कापणी करावी. नंतर दुसरी फवारणी कापणीनंतर 8 दिवसांनी आणि तिसरी फवारणी कापणीनंतर 15 दिवसांनी नियमित केल्यास 18 ते 22 दिवसात योग्य घास प्रत्येक वेळी तयार होतो.

 

  • लसूणघासाचे वार्षिक एकरी उत्पादन 40 ते 50 टन मिळते.
English Summary: lasun ghaas useful for animal Published on: 05 July 2021, 11:50 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters