आपल्या देशातील सर्रास शेतकरी शेतीबरोबरच पशुपालन सुद्धा करत असतात पशुपालन म्हणजे शेतकरी बांधवांचा एक प्रकारचा जोडव्यवसाय पशुपालनाच्या माध्यमातून हे दुग्ध व्यवसाय सुद्धा करून बक्कळ पैसे कमवत आहेत. यासाठी शेतकरी गाई (cow)म्हैस शेळी जर्सी गाई यांचे पालनपोषण करत असतात.
जनावरांच्या पोटामध्ये प्लास्टिक:
सध्या दुधाला चांगला भाव असल्यामुळे जनावरांच्या किमती मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. मानवी जीवन आणि जनावरांचे जीवन यामध्ये फारसा फरक आपल्याला आढळून येत नाही. त्यामुळे जनावरांच्या आहारावर लक्ष्य देणे सुद्धा खूप गरजेचे आहे. बऱ्याच वेळा आपण ऐकतो की जनावरांच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडले परंतु हा प्रश्न नक्कीच पडत असेल की जनावरांच्या पोटामध्ये नेमकं प्लास्टिक येत तरी कुठून.
हेही वाचा:दुग्धव्यवसाय करायचंय! दुसऱ्या वेतातील निवडा जनावरे आणि मिळवा जास्त दुधाचे उत्पादन
सर्वसाधारण पणे आपल्या घरातील राहिलेले शिळे अन्न(food) किंवा कचरा आपण फेकून देताना प्लास्टिक पिशवी चा वापर करतो. त्यामुळे जनावरे त्यामधी खाताना प्लास्टिक गिळण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे जनावरांच्या पोटामध्ये प्लास्टिक जमा होते आणि जनावरांची रवंथ करण्याची प्रक्रिया एकदम संथ आणि मंद होते. त्यामुळे जनावरांच्या पोटामध्ये तयार झालेला गॅस बाहेर पडत नाही त्यामुळे जनावरांना पोटफुगी होते. काही वेळेस यामध्ये जनावरे दगावण्याची शक्यता जास्त असते.
काही वेळेस अखाद्य गोष्टीमुळे जनावरांच्या पोटामध्ये खिळे, लोखंड,खिळे, तारेचे तुकडे सुद्धा जातात त्यामुळे या धारधार वस्तूंमुळे जनावरांच्या आतड्याला इजा होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. प्लास्टिक खाल्लेले जनावर ओळखणे खूप अवघड असते कारण प्लास्टिक सुरवातीस पोटात साचते नंतर हळूहळू त्याचा त्रास होण्यास सुरुवात होते. प्लास्टिक खाल्लेल्या जनावरे ही चारा कमी खाऊ लागतात तसेच आजारलेल्या प्रमाणे दिसून येतात शिवाय दूध देण्याची क्षमता कमी होते यासारखी कारणे आढळून येतात. तसेच जनावरांच्या प्रजजन क्षमतेमध्ये सुद्धा फार मोठा परिणाम होतो.
त्यामुळे आपल्या जनावरांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी आणि जनावरांच्या खाण्यात किंवा खाद्यामध्ये अखाद्य वस्तू येणार नाहीत याची प्रामुख्यानं काळजी घ्यावी. त्यांना नियमित समतोल आहाराचा पुरवठा करावा. शिवाय जरी अखाद्य वस्तू पोटात गेली तरी तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करून पोटामधील।प्लास्टिक लोखंड यासारख्या अखाद्य वस्तू काढून टाकाव्यात.
Share your comments