भारतातील शेतकरी शेती व्यवसायासोबत पशुपालन (animal husbandry) व्यवसायही मोठ्या प्रमाणात करतात. मात्र पशूपालन व्यवसाय करताना विशेष काळजी घेण्याची गरज असते. जनावरांच्या आहारासोबत त्यांच्यातील कॅल्शिअम देखील तितकेच गरजेचे असते.
माहितीनुसार जनावरांच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण (Calcium content) जवळ जवळ एक टक्के एवढे असते. राहिलेले शरीरातील ९९ टक्के कॅल्शिअम हाड व दातांमध्ये असते. कॅल्शिअम मऊ पेशीत व रक्तात साठवलेले असते. याची कमतरता असेल तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ते कसे याविषयी सविस्तर माहिती पाहूया...
कॅल्शिअमच्या कमतरतेची लक्षणे
१) वाढ खुंटणे, दूधउत्पादन घटणे, रक्त गोठण्यास वेळ लागणे, हाडे ठिसूळ होणे, स्नायूत अशक्तपणा येतो.
२) लहान व तरुण जनावरात मुडदूस व प्रौढ/ वयस्कर जनावरात ‘उरमोडी’ होणे, चारा खाण्याचे प्रमाण कमी होते.
३) प्रजोत्पादनासंबंधी समस्या उद्भवतात. गाई व म्हशीमध्ये दुग्धज्वर आजार होतो.
शेतकऱ्यांना 'या' 12 योजनेतून मिळणार 75 टक्के अनुदान; 83 लाख रुपयांचा निधी जाहीर
कॅल्शिअमची गरज
हाड व दातांची उत्तम वाढ होण्यासाठी, रक्त गोठवण्यासाठी कॅल्शिअमची (Calcium) गरज असते. जनावरांच्या शरीरामध्ये पाण्याचे संतुलन करणे, ऑस्मॉटिक प्रेशर संतुलन करण्यासाठी उपयुक्त ठरते. मांस पेशी व मज्जा संस्थेवर नियंत्रण करते. शरीरामध्ये विविध प्रकारचे विकार तयार होण्यासाठी मदत करते. गाई आणि म्हशीमध्ये प्रजोत्पादनासंबंधी समस्या दिसतात.
सावधान! शेळ्या-मेंढ्यांमध्ये वाढतोय न्यूमोनिया आजार; करा वेळीच उपाय
कॅल्शियम कमतरतेमुळे परिणाम
जनावरांची वाढ खुंटते, दूध उत्पादन कमी होते, शरीरातील रक्त गोठण्यास वेळ लागतो. हाडे ठिसूळ होतात. स्नायूत अशक्तपणा येतो. लहान जनावरात मुडदूस आणि प्रौढ जनावरांत उरमोडीची लक्षणे दिसतात. चारा खाण्याचे प्रमाण कमी होते.
उपचार
नियमितपणे खाद्यातून कॅल्शियमयुक्त क्षारमिश्रणे (Alkalinity) मोठ्या जनावरात ५० ते १०० ग्रॅम तर लहान जनावरांत १५ ते २० ग्रॅम रोज याप्रमाणे द्या. याशिवाय पशुतज्ज्ञाच्या सल्याने उपचार करा.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो कमी कालावधीत बक्कळ पैसा कमवायचा आहे? तर प्लायमाउथ रॉक कोंबडीचे पालन कराच...
रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; मोफत रेशनबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Share your comments