मागील काही दिवसांपूर्वी अनेक ग्रामीण भागामध्ये अशा घटना घडल्या होत्या ज्यामुळे तेथील लोक आपल्या पाळलेल्या जनावरांना एका घरामध्ये ठेवण्यासाठी जागा करू लागले होते. अगदी काही दिवसांपूर्वी गावोगावी आपणास वन्यप्राणी पाहायला भेटू लागले होते जे की वाघ, चित्ता. गावातील पाळीव प्राण्यांवर हे वन्यप्राणी हल्ला करायचे आणि त्यांना जीवे मारून टाकायचे. अशा घटनांमुळे ग्रामीण भागातील पशुपालक वर्ग घाबरला होता. जे की अजूनही काही ठिकाणी अशा घटना आपणास पाहायला भेटत आहेत. ग्रामीण भागातील पशुपालकवर्ग आपल्या घरी असणारी शेळी असो किंवा गाई म्हशी असो त्यांना चरण्यासाठी ते रानावनात घेऊन जातात. जे की त्या ठिकाणी या पाळीव प्राण्यांवर लांडगा हल्ला करून त्यांना ठार करतात. जे की त्यावेळी तो व्यक्ती सुद्धा काही करू शकत नाही. मात्र त्यावेळी जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर तुम्हाला त्या जनावराची नुकसानभरपाई मिळणार आहे.
नुकसानभरपाई कशी मिळवावी :-
१. जर तुम्ही पाळलेली कोणतेही जनावर असो जसे की गाई असो किंवा म्हैस असो. या पाळलेल्या जनावरावर जर एखाद्या वन्य प्राण्याने हल्ला केला आणि ते जनावर जर ठार झाले तर तेव्हापासून ४८ तासाच्या आतमध्ये त्या पशुपालकाने तिथे जवळ असणाऱ्या वन अधिकारी वर्गाशी संपर्क साधावा आणि त्यांना घटनास्थळी काय झाले आहे ते पूर्ण सांगावे.
२. ज्या ठिकाणी जंगली म्हणजेच वन्य प्राण्यांनी तुमचे जनावर ठार केले आहे त्या ठिकाणाहून आजिबात जनावर हलवू नये. जो पर्यंत तुम्ही संपर्क केलेला वनाधिकारी घटनास्थळी पोहचत नाही तो पर्यंत त्या जनावराचे शव त्याच जागी ठेवावे.
३. ज्या ठिकाणी जनावराचा मृत्यू झाला आहे किंवा जनावर जखमी झाले आहे त्या ठिकानापासून १० किलोमीटर अंतरावर कोणतही वन्य प्राणी विषबाधा होऊन ठार झाला नसावा.
४. ज्यावेळी तुम्ही वन-अधिकारी मंडळाशी संपर्क साधता त्यानंतर तो वन अधिकारी झालेल्या घटनास्थळी स्वतः येतो आणि सर्व प्रकार बघून काही गोष्टींची विचारपूस, पडताळणी करून पंचनामा करत असतो. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये पाळीव प्राणी जखमी झाला आहे किंवा त्या प्राण्याचा मृत्यू झाला आहे असा खातरजमा वन अधिकारी करत असतो.
५. वन अधिकारी सर्व माहिती घेऊन पंचनामा केला की नंतर काही दिवसांनी या सर्व घटनेची पडताळणी होऊन त्या मालकास बोलवून घेऊन पुन्हा सर्व माहिती सर्व चौकशी करून त्यास झालेल्या जनावराची नुकसानभरपाई दिली जाते.तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याचा कोणत्या जंगली प्राण्यांचा हल्ल्यात मृत्यू झाला तर अशी नुकसानभरपाई भेटवू शकता.
Share your comments