गाय म्हैस विल्यानंतर गुलकोज बरोबरच कॅल्शियमची ही नितांत आवश्यकता असते. त्यामुळे गाई आणि म्हशींच्या संक्रमण काळात जनावरांचे उत्तम व्यवस्थापन, चांगल्या प्रतीचा पोषक आहार आणि रोगप्रतिबंधक उपाययोजना या प्रमुख तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे फार गरजेचे असते.
गाय आणि म्हशींच्या संपूर्ण वेता मध्ये मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण हे संक्रमण काळातील घेतलेल्या काळजी वरच अवलंबून असते. त्यामुळे संक्रमण काळाचे महत्व ओळखून दुभत्या जनावरांची पुरेपूर व्यवस्थित काळजी पशुपालकांनी घ्यावी. संक्रमण काळ हा दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि नाजूक काळ असून गाय आणि म्हैस लवकर गाभण राहण्यासाठी या काळातील घेतलेली काळजीच पुढे उपयुक्त ठरत असते.
हेही वाचा :ठाकर समाजाचे उदरनिर्वाह करणारा डांगी गोवंश; संवर्धनासाठी लोकपंचायतचे प्रयत्न
संक्रमण काळात आवश्यक असलेली कॅल्शियमची गरज
- गाय, म्हैस विल्यानंतर ग्लुकोज बरोबरच कॅल्शिअमची गरज आहे वाढते. पहिल्या दिवशी तर ही गरज तीन पटीने जास्त असते. यावेळेस चिक किंवा दुधावाटे कॅल्शियम शरीराबाहेर जात असते त्यामुळे पहिल्या आठवड्यात कॅल्शियमची गरज जास्त भासते.
- शरीरातील संप्रेरके हाडांमधील कॅल्शियम काढून रक्तामधील त्याचे प्रमाण वाढवतात. जेणेकरून चिक व दूधनिर्मिती ला कॅल्शियम कमी पडू नये. परंतु जेव्हा खाद्यामध्ये पोटॅशियम व सोडियम चे प्रमाण जास्त असते तेव्हा या घटकाचे रक्तातील प्रमाण वाढून रक्ताचा सामू अल्कली स्वरूपाचा बनतो.
- जास्त पोटॅशियम मुळे मॅग्नेशिअमची उपलब्धता कमी होते. त्यामुळे शरीराची कॅल्शिअमची कमतरता ओळखण्याची क्षमता कमी होते. यामुळे संप्रेरकांचे रक्तातील प्रमाण कमी होते व शरीरातील कॅल्शियम दूध उत्पादन व इतर शारीरिक कामांसाठी उपलब्ध केले जात नाही. किंवा खाद्यातील कॅल्शियम कमी शोषला जातो. अशावेळी रक्तात शोषले जाणारे कॅल्शिअम याकाळात तोंडावाटे देणे आवश्यक असते.
- गाई-म्हशींना अशा वेळेस कमी पोटॅशियम कमी सोडियम असलेल्या आहार द्यावा. मॅग्नेशियमचे प्रमाण मात्रा वाढवावी. पशु आहारामधील मीठ व सोडा यांचा वापर कमी करावा. त्यामुळे रक्ताचा सामू थांबलो स्वरूपाचा राहण्यास मदत होईल जेणेकरून संप्रेरके हाडांमधील वाचण्यात मधील कॅल्शियम दुधासाठी जास्त प्रमाणात उपलब्ध करू शकतील. तसेच काही पूरक खाद्य वापरून शरीरातील रक्ताचा सामू आंबलं स्वरूपाचा दुभत्या गाई-म्हशींना होणाऱ्या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.
- गाभण काळात कमी कॅल्शियम व जास्त मॅग्नेशियम अशा स्वरूपात खनिजांची उपलब्धता ठेवावी. गाभण काळात जास्त कॅल्शिअम दिले गेल्यास ते शरीरात शोषले जाण्याची क्रिया मंदावते कारण दूध उत्पादन नसल्यामुळे कॅल्शियम शरीरात शोषून घेणाऱ्या रीसेपाटार्सचे कार्य मंदावते त्यामुळे गाय म्हैस व्याल्यानंतर त्याचा फटका बसतो. विल यावर तोंडावाटे दिलेला कॅल्शियम शरीरात कमी शोषला जातो व जनावराला मिल्क फिवर किंवा दुधाचा ताप हा आजार होण्याची शक्यता बळावते.
- संक्रमण काळातील एकूण सहा आठवड्यात दुभत्या जनावरांची रोगप्रतिकार क्षमता ही कमी झालेली असते. त्यामुळे कासेचा दाह किंवा गर्भाशयाचा दाह इत्यादी रोगांना जाणार बळी पडू शकते.
संक्रमण काळातील आहार
- शेवटच्या तीन आठवड्यात पचण्यास सोपा जास्त पाचक तत्वे असलेला आहार सुमारे चार ते पाच किलो प्रतिदिन विभागून खाऊ घालावा. हिरवा तसेच कोरडा चारा गरजेनुसार द्यावा.
- विल्यानंतर सुरुवातीला दुभत्या गाई म्हशींची भूक कमी असते अशा वेळेस जास्त ऊर्जा व जास्त पचनीय प्रथिने असलेला आहार द्यावा जेणेकरून जनावरांच्या शरीराला कमी खाद्यामध्ये जास्त पोषक तत्व मिळू शकते.
- चांगल्या प्रतीच्या आहारासाठी पशु आहार तज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रति लिटर दुधामागे 400 ते 500 ग्राम पशुखाद्य व शरीर स्वास्थ्यासाठी एक ते दोन किलो पशुखाद्य दररोज विभागून द्यावे.
- एकूण सहा ते सात किलो पशुखाद्य सुमारे 15 ते 20 लिटर दूध देणाऱ्या गाई साठी व सुमारे आठ ते दहा लिटर दूध देणाऱ्या म्हशी साठी देणे आवश्यक असते. तसेच हिरवा व कोरडा चारा शारीरिक गरजेनुसार द्यावा.
वरील प्रकारे जर संक्रमण काळात आणि गावं काळामध्ये जनावरांची कॅल्शिअमची गरज ओळखून आहाराचे नियोजन केले तर पशुपालकांना त्याचा फायदा होतो.
Share your comments