1. पशुधन

दुधाळ जनावर घ्यायचं आहे! या प्रकारे करा जनावराची पाहणी अथवा फसवणूक होईल

शेतीला जोडव्यवसाय म्हणून आजकाल प्रत्येक जण दुधव्यवसायावर भर देत आहे जो की शेतकऱ्याला शेतीबरोबरच चांगला फायदा दुधव्यवसायातून मिळतो. शेतकऱ्याला आर्थिकरित्या मजबूत बनवण्यासाठी पशुपालन हा चांगला पर्याय आहे जो की आजकाल प्रत्येक शेतकरी पशुपालन करण्याकडे आपला कल ओळवत आहे. पशुपालन करणे हा एक कृषी व्यवसाय आहे ज्यामधून शेतकऱ्यांना दूध ही मिळते पण त्याचबरोबर शेणखत सुद्धा मिळते. दुधाच्या व्यवसायातून शेतकरी चांगल्या प्रकारे नफा काढतो तसेच आपल्या शेतात बाहेरून विकतचे शेणखत आणण्यापेक्षा घरचे शेणखत वापरू शकतो. मात्र यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जनावरे खरेदी करताना तुम्हाला योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे नाहीतर याबाबतीत तुम्हाला नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. जनावरे घेताना कोणती काळजी घ्यायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

किरण भेकणे
किरण भेकणे
animal

१. जनावरांच्या दातावरून वयाचा अंदाज लावणे :-

सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही जे जनावर घ्यायला गेला आहे त्याच्या दातावरून तुम्हाला त्याचे बरोबर वय समजू शकते. कारण जनावर दोन वर्षाचे असतानाच त्याला कायमची दाताची पहिली जोडी तयार होते. तर त्या जनावराला दाताची दुसरी जोडी चौथ्या वर्षाच्या शेवटी येते. आणि ज्यावेळी जनावराचे सहा वर्षे वय झालेले असते त्यावेळी त्याचे पाठीमागचे दोन दात पडलेले असतात. तर तुम्ही या आधारे जे जनावर घेणार आहेत त्याचे वय ओळखू शकता.

२. जनावरांच्या आरोग्याची चाचणी :-

जनावरे पाहताना त्याची आरोग्य चाचणी करणे खूप गरजेचे आहे. जसे की त्याचे डोळे हे तेजस्वी असावेत तसेच निर्दोष असावेत म्हणजेच डोळ्यामध्ये कोणताही दोष नसावा. तेथील आजूबाजूचे जे लोक असतील त्यांच्याकडून जनावराची विचारपूस करावी तसेच त्याला कोणता रोग आहे का किंवा त्याच्या लसीकरणबाबत विचारपूस करणे गरजेचे आहे. दरवर्षी जनावराच्या वासराला जन्म दिलेला असावा ही सर्वात महत्वाची बाब आहे. जनावरचा कोणताही प्रकारचा गर्भपात झालेला नसावा. जनावर हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताच असावे.

३. जनावरांचे दूध :-

पाहायला गेलेल्या जनावराचे दूध तीन वेळा काढावे कारण जो व्यापारी असतो तो खूप फसवण्याचा प्रयत्न करतो. तो तुम्हाला जनावराचे एक वेळाच दूध काढून दाखवतो. तसेच दूध पातळ आहे की घट हे पाहणे गरजेचे आहे तसेच दुधाला फॅट किती लागेल हा अंदाज सुद्धा तुम्ही घ्यावा. ज्या जनावराला मोठी कास आहे ते जनावर विकत घ्या.

४. शिंगावरून वयाचा अंदाज लावणे :-

जनावराला त्याच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी शिंगावर पहिली रिंग तयार होते त्यानंतर मग प्रत्येक वर्षी रिंग तयार होण्यास सुरुवात होते. जनावराच्या शिंगाच्या रिंगवरून तुम्ही प्राण्याचे वय शोधू शकता.

५. कासाची पाहणी कशी करावी :-

जनावर खरेदी करताना त्याच्या कासेची बारकाईने पाहणी करावी. कारण काही जनावरांना कासेला गुठळ्या, सूज असते जे की पाहणी केल्याने आपणास समजते. पोट फुगलेले जनावर असो किंवा कास फुगलेले जनावर असो तर आजिबात विकत घेऊ नये. अनेक वेळा लोकांची यामधून फसवणूक होते तर या सर्व गोष्टी बघूनच जनावर विकत घ्यावे.

English Summary: I want to take a milch animal! Do it this way, the animal will be inspected or cheated Published on: 21 February 2022, 07:47 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters