पशुपालन व्यवसायामध्ये दूध उत्पादनाला अनन्यसाधारण महत्त्व असून दूध उत्पादन हेच पशुपालकांचा आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आहे. दूध उत्पादनामध्ये दुधाचा फॅट हा खूप महत्वपूर्ण असून दुधापासून मिळणारे आर्थिक उत्पन्न हे दुधातील फॅट वरच अवलंबून आहे. बर्याच कारणांमुळे दुधातील फॅट कमी लागतो व शेतकऱ्यांना मिळणारा पैसा साहजिकच कमी होतो. त्यामुळे काही सोपे उपाययोजना आणि व्यवस्थापनाविषयी बारकाईने लक्ष जर पशुपालकांनी ठेवले तर नक्कीच त्याचा फायदा फॅट वाढण्यावर होतो व आर्थिक उत्पन्न आपोआपच वाढते.
दुधातील फॅट का कमी होतो?
1- जनावरांचा आहार- जनावरांना जो काही आहार दिला जातो त्याच्यावर दुधाचा फॅटचे सगळे गणित अवलंबून असते. आपले शेतकरी गाईंना किंवा म्हशीना काही खाद्य देतात त्या सोबत तेलाचा वापर करतात.
जसे के जनावरांच्या आहारात सरकीच्या तेलाचा अंश जरी असला तर त्यामुळे दुधाचा फॅटमध्ये थोडी वाढ संभवते. परंतु आहारातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण वाढल्यास जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होऊन दुधाचे प्रथिनांमध्ये घट येते.
नक्की वाचा:Animal Related: पशुपालकांनो! दुधाची फॅट कमी लागते का? ही असतात त्यामागील कारणे
2- हवामानाचा परिणाम- जर आपण हिवाळ्याचा विचार केला तर हिरवा चारा मुबलक प्रमाणात असतो त्यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ होते परंतु फॅटचे प्रमाण कमी होते. यासोबतच उन्हाळ्या ऋतूमध्ये कोरडे वैरणीचा समावेश असल्याने दुधातील स्निग्धांश वाढतात.
एवढेच नाही तर उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असल्यामुळे जनावरे जास्त पाणी पितात व कमी चारा खातात. त्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढल्यामुळे दूध उत्पादन आणि दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण कमी होते.
3- कासदाह आजार- म्हशींना किंवा गाईंना कासदाह आजाराची लागण झाली तर यामुळे देखील दुधातील फॅटचे प्रमाण सरासरीपेक्षा जवळजवळ निम्मी कमी होतो.
4- दूध काढण्याची वेळ खूप महत्वपूर्ण- दूध आपण दोन वेळेस काढतो, यात दूध काढण्याच्या दोन वेळा मध्ये जास्तीत जास्त बारा तासाचे अंतर असणे गरजेचे आहे.अंतर वाढल्यास दुधाचे उत्पादन वाढते परंतु फॅट कमी होतो.
दुधातील फॅट वाढवण्यासाठी करा 'या' उपाय योजना
1- दूध काढताना जनावरांची कास स्वच्छ धुवावी. कासेतील रक्ताभिसरण वाढेल. दुधातील स्निग्धांशाचे प्रमाणात देखील वाढ होईल व दूध सात मिनिटांमध्ये पूर्णपणे काढावे.
2-जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश करावे. उसाच्या वाड्यांचा वापर टाळावा. भाताचा पेंढा, गव्हाचा काड इत्यादी प्रकार असा निकृष्ट चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दुधातील फॅट कमी होतात.
3- गाई म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी, मक्का, भरडा, तुर, हरभरा, मुगचुनी, गव्हाचा कोंडा इत्यादी योग्य प्रमाणात द्यावे. बारीक दळलेले धान्य किंवा तेल देऊ नये.
Share your comments