पशुपालन करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. पशुपालनात साधारणपणे ६० ते ७० टक्के खर्च हा जनावरांच्या खाद्यावर, तर उर्वरित ३० ते ३५ टक्के खर्च आरोग्यावर होतो. यामुळे आरोग्याची काळजी घेतल्यास ते पैसे वाचतात. याचा फायदा शेतकऱ्यांना होतो.
प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. विशेषतः पावसाळ्यात जनावरांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, पावसाळ्यात जनावरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी गोठा स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे. कारण पावसाळ्यात हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे जीवजंतूचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच खाद्यामध्ये बदल झाल्यामुळे पोटाचे आजार उद्भवतात.
पावसाळ्यात जास्त आर्द्रता आणि कमी तापमान या बाबींमुळे गोठ्याचा पृष्ठभाग कायम ओलसर राहतो. यामुळे गोठ्यात विविध रोगजंतूंची वाढ होऊन जनावरे आजारी पडण्याची शक्यता असते.
त्यासाठी पावसाळ्यात गोठा, खाद्य आरोग्यावर भर देऊन जनावरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पोटफुगी टाळण्याकरिता पावसाळ्यात जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत सुके खाद्य दोन ते तीन किलो या प्रमाणात द्यावे.
त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थितरीत्या कार्य करते. जनावरांना दिवसभर फक्त कोवळा हिरवा चारा खाऊ घालू नये.
जखम झालेली जागा पोटॅशिअम परमॅंग्नेटच्या साह्याने स्वच्छ धुऊन मलमपट्टी करावी. जनावरे जास्त चिखल असलेल्या ओबडधोबड ठिकाणी चरायला सोडू नयेत. गोठ्यातील खड्डे बुजवून घ्यावेत. गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवावा.
पावसाळ्यापूर्वी घटसर्प, एकटांग्या या आजारांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे. शेळ्या-मेंढ्यामध्ये आंत्रविषार रोगाची प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.
लसणाची प्रति किलो दोनशे रूपयांकडे वाटचाल, शेतकरी सुखावला...
उन्हामुळे चिकनच्या दरात मोठी, पिलांची मर वाढली..
LiGHT अकोल्याच्या सदस्यांचा बाभुळगाव येथील 'कृषोन्नती' कार्यक्रम यशस्वी
Share your comments