1. पशुधन

शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायात दूध उत्पादन करून कमवा लाखो रुपये, वाचा सविस्तर..

अनेक शेतकरी शेळीपालनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतकऱ्यांना त्याचा जोडधंदा नेहेमी आर्थिक परिस्थितीतुन बाहेर काढत असतो. शेळी पालन हा त्यापैकी एक. यामध्ये अनेकजण शेळीपालन करत असतात. यामध्ये भरघोस उत्पन्न देणारी शेळी खूप फायदेशीर ठरते. शेळीचे संगोपन करण्यामध्ये खर्चही कमी होतो तिच्यातून मिळणारे उत्पन्न जास्त असते. शेळयांना इतर जनवरांपेक्षा कमी प्रमाणात खाद्य लागते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
goat farming business

goat farming business

अनेक शेतकरी शेळीपालनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतकऱ्यांना त्याचा जोडधंदा नेहेमी आर्थिक परिस्थितीतुन बाहेर काढत असतो. शेळी पालन हा त्यापैकी एक. यामध्ये अनेकजण शेळीपालन करत असतात. यामध्ये भरघोस उत्पन्न देणारी शेळी खूप फायदेशीर ठरते. शेळीचे संगोपन करण्यामध्ये खर्चही कमी होतो तिच्यातून मिळणारे उत्पन्न जास्त असते. शेळयांना इतर जनवरांपेक्षा कमी प्रमाणात खाद्य लागते.

गरीब शेतकऱ्यांसाठी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला व्यवसाय आहे. यामुळे याकडे शेकजण वळाले आहेत. तसेच कमीत कमी वेळेत शेळीपालनाची कामे देखील उरकतात. यामुळे याचा अनेकांना फायदा होतो. यासाठी विदेशी जातीच्या शेळीची निवड केली तर अजूनच फायदेशीर आहे. मात्र याच्या हवामानाबाबत सविस्तर माहिती घेऊन या शेळ्या आणाव्यात.

शेळ्यांच्या विदेशी जातीमध्ये तोगेनबर्ग हा स्वित्झर्लंडचा एक बकरी आहे. त्याच्या नर आणि मादीला शिंगे नसतात. हे दररोज सरासरी 3 किलो दूध देते. यामुळे शेळीपालनामध्ये हा एक चांगला पर्याय आहे. ज्या संकरित जातीच्या शेळ्या असतात त्या रोगांना कमी संवेदनशील असतात आणि त्यांचे मांस देखील चवदार असते. अशा पद्धतीने विदेशी शेळी जाते भरघोस उत्पन्न देण्यास खूप मदत करतात. यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो.

'शेती फायदेशीर करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न सुरु'

तसेच सानन दुधाची राणी म्हणून ओळखली जाणारी सानन जात ही देखील स्वित्झर्लंडची शेळी आहे. त्याठिकाणी शेळीपालन करताना अनेकजण हा पर्याय निवडतात. त्याची दूध उत्पादन क्षमता इतर सर्व जातींपेक्षा जास्त आहे. हे आपल्या घरांमध्ये दररोज सरासरी 3-4 किलो दूध देते. यामुळे ते फायदेशीर ठरते. गाईपेक्षा हा पर्याय शेतकऱ्यांकडे आहे.

ॲंग्लोन्युबियेन हे अनेकदा युरोपच्या वेगवेगळ्या देशांमध्ये आढळते. हे मांस आणि दूध दोन्हीसाठी योग्य आहे. त्याची दूध उत्पादन क्षमता प्रतिदिन 2-3 किलो आहे. तसेच याच्या मांसाला मोठी मागणी देखील असते. तसेच अल्पाइन ही स्वित्झर्लंडमधील जात आहे. मुख्यतः दूध उत्पादनासाठी योग्य आहे. या जातीच्या शेळ्या त्यांच्या घरी रोज सरासरी 3-4 किलो दूध देतात. यामुळे ही एक फायदेशीर शेळी आहे.

महाराष्ट्रात टाटा पॉवर उभारणार 150 मेगा मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प...

या शेळ्या दिवसाला भरपूर दूध देतात. या जातीच्या शेळीचे एका दिवसाचे दूध उत्पादन ५ लिटरपर्यंत जाते. सध्या गाईपालन हे खाद्याच्या वाढत्या रेटमुळे परवडत नाही. यामुळे अनेकदा हा धंदा तोट्यात जातो. शेळी पालन केव्हाही फायद्याचे ठरते. यामुळे जोडधंदा म्हणून शेतकरी याकडे वळाले तर शेतीसोबत चार पैसे मिळणार आहेत.

महत्वाच्या बातम्या;

 

English Summary: Farmers earn lakhs rupees producing milk in goat farming business, read in detail.. Published on: 14 November 2022, 05:28 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters