1. पशुधन

शेळीपालनात महत्वाचे आहे शेळी माजावर येणे; वाचा शेळी माजावर येण्यासाठीचे उपाय

शेळीपालनाचे उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडांवर अवलंबून असते. सुदृढ करडे मिळवण्यासाठी शेळ्यांचे प्रजनन व्यवस्थापन करावे. शेळीची प्रथम लागवड एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच करावी. शेळ्यांमध्ये 18 ते 21 दिवसांनी माज येतो

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
precaution of before pregnancy of goat

precaution of before pregnancy of goat

शेळीपालनाचे उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडांवर  अवलंबून असते. सुदृढ करडे मिळवण्यासाठी शेळ्यांचे प्रजनन व्यवस्थापन करावे. शेळीची प्रथम लागवड एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच करावी. शेळ्यांमध्ये 18 ते 21 दिवसांनी माज येतो.

माजाचा कालावधी हा 24 ते 36तासांचा असतो.माजावर आल्यावर 10 ते 12 तासांनी शेळ्या भराव्यात. शेळ्या माझा वर येण्याचा कालावधी हा जुलै ते जानेवारीहा जास्त करुन असतो. गाभण काळ हा पाच महिन्याचा असतो. या लेखामध्ये आपण  शेळी माजावर येण्यासाठी चे उपाय पाहू व माहिती घेऊ.

नक्की वाचा:कोरोना, कोरोना कधी जाईल हा कोरोना! राज्याला कोरोना च्या चौथ्या लाटेचा धोका? सरकारने जारी केला अलर्ट

1) शेळी माजावर येण्यासाठी उपाय      

 दिवसेंदिवस वाढणारी मासांची मागणीमुळे शेळी पालन करून सर्वसामान्य शेतकरी चांगल्याप्रकारे अर्थप्राप्ती करू शकतो. परंतु यासाठी शेळी पैदाशीचे आधुनिक तंत्र माहिती असणे गरजेचे आहे.असे आधुनिक तंत्र माहिती करून घेतल्यास शेळीपालन व्यवसायातील नफा अधिक वाढण्यास मदत होते. शेळीपालन हे प्रामुख्याने मांस उत्पादन, दूध, चमडे,केस,लेंडी (खत) इत्यादी गोष्टींसाठी केली जाते.

असे असले तरी प्रजोत्पादन हा सर्वात महत्त्वाचा शेळीपालनाचा उद्देश असतो आणि यातूनच मोठ्या प्रमाणात अर्थप्राप्ती होते.

 प्रत्येक शेळीच्या प्रजोत्पादनाचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. शेळ्या वर्षभर कोणत्याही ऋतूमध्ये माजावर येतात. कमी सूर्यप्रकाश या काळामध्ये असतो त्या काळात शेळ्या अधिक माजावर येतात. असे निदर्शनास आले आहे. पारंपारिक शेळी पालन करणारे शेतकरी कळपामध्ये सतत बोकडे ठेवतात. जवळपास 80 ते 100 टक्के शेळ्या या वर्षभर माजावर येतात. परंतु पावसाळ्यानंतर म्हणजेच जुलै ते ऑगस्ट महिन्या दरम्यान शेळ्यांना खाण्यासाठी पुरेशा प्रमाणात चारा न मिळाल्यामुळे बहुतेक शेळ्या याच काळात माजावर येतात. बंदिस्त पद्धतीने शेळी पालन जेव्हा केले जाते तेव्हा शेळ्यांना सकस आहार वर्ष भर देण्यात येतो त्यामुळे बंदिस्त शेळ्या केव्हाही माजावर येतात. नैसर्गिक प्रजोत्पादन शिवाय व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून व उत्तम व्यवस्थापन करून शाळेची प्रजोत्पादन क्षमता निश्चित वाढवता येते.

नक्की वाचा:अरे वा खुपच छान! टेस्ट ट्यूब बेबीद्वारे कालवडींचा जन्म, वीस लिटर दूध उत्पादन क्षमता

2) शेळ्या माजावर आणणे

 आपल्या कळपातील अधिक शेळ्या एकाच वेळी आपणास माजावर पाहिजे असेल तर ते शक्य आहे . यासाठी शेळ्यांना औषध दिले जाते. एकाच वेळी कळपातील सर्व शेळ्या माजावर आल्याने एकाच वेळी त्यांना भरावे लागते आणि एकाच वेळी त्या सर्व वितात. कळपामध्ये वेगवेगळ्या दिवशी माजावर येणाऱ्या शेळ्या असतात. इंजेक्शन दिल्यानंतर 55% शेळ्या योग्य माजावर येतात यासाठी पुन्हा दहा-बारा दिवसानंतर शेळ्या माजाची लक्षणे दाखवतात. इंजेक्शन व्यतिरिक्त कॅप्सूल इत्यादीचा वापर देखील यासाठी केला जातो नैसर्गिक पद्धतीत बोकडा पासून शेळी 6 आठवडे वेगळी काढली जाते. 

आणि खच्ची केलेले बोकडे चार दिवस कळपात ठेवली जातात. व खच्ची केलेल्या बोकड यांच्या सहवासामुळे शेळ्या माजावर येतात. बोकडाच्या ग्रंथीमुळे येणाऱ्या विशिष्ट वासामुळे मादीच्या जननेंद्रिय यांना उत्तेजन मिळते. इतर देशात जून महिन्यात अशा माद्या दिवसातून 17 तास अंधारात ठेवल्या जातात त्यामुळे त्या माजावर लवकर येतात.

English Summary: important period of before pregnancy of goat that depands on total success of goat rearing Published on: 21 March 2022, 03:44 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters