शेतकरी शेतीसोबत (agriculture) जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय (Dairying) करण्यावर भर देत असतात. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना जनावरांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे? निगा कशी राखावी? जेणेकरून आजारांपासून दूर राहतील, याविषयी माहिती नसते. त्यामुळे आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनासाठी शेतामध्ये सुपर नेपिअर, ऊस या चारा पिकांची लागवड करावी. प्रत्येक जनावरास दररोज दोन वेळा ३० किलो चारा कुट्टी द्यावी. त्यात वाळलेला चारा ८ किलो, हिरवा चारा २२ किलो प्रमाणे द्या.
वाळलेल्या चाऱ्यामध्ये कडबा, हरभरा भुसकट, सोयाबीन (soybeans) व गव्हाचा भुस्सा तर ओल्या चाऱ्यामध्ये नेपिअर गवत, ऊस, कडवळ, मका आणि शेतातील काढलेले गवत ही पिके येतात.
याशिवाय जनावरांना दररोज दोन वेळ खुराक द्या. या खुराकामध्ये सरकी पेंड, मका, गव्हाचे पीठ, कडधान्य, मीठ, कॅल्शिअम, खाण्याचा सोडा असे सर्व मिश्रण एकत्रित करून द्या. हे मिश्रण दुभत्या जनावरांना ५ किलो तर भाकड जनावरांना २ किलो प्रमाणे देणे गरजेचे.
कृषी विद्यापीठाकडून नवीन ट्रॅक्टरचलित यंत्र लॉन्च; अशाप्रकारे करा उसातील आंतरमशागत
लसीकरणावर भर द्या
जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. दर सहा महिन्याला एफएमडीचे लसीकरण करा. तसेच सध्या उद्भवत असलेल्या लम्पी स्कीन (Lumpy skin) या आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण केले आहे. पोखणी येथील कृषी विज्ञान केंद्रातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लसीकरण केले जात आहे.
'या' एका चाचणीने कळेल तुमच्या शरीरातील हृदयरोगाचे प्रमाण; वेळीच घेता येणार काळजी
असे ठेवा गोठ्याचे व्यवस्थापन
1) गोठ्याची स्वच्छता
गोठा स्वच्छ असला पाहिजे. खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी गोठ्याची रचना करा. दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी. दूध काढताना जमिनीवर कुठलाही कचरा अगर शेण असू नये. गोठा निर्जंतुक पाण्याने स्वच्छ धुवावा, त्यामुळे धूळ उडणार नाही.
जमिनीपासून चार-पाच फुटांपर्यंत चुना लावावा, त्यामुळे गोठा जंतूविरहित राहतो. तसेच गोमूत्र व पाणी निचरा होईल अशी गोठ्याची रचना असावी. गोठ्याबरोबर शोषखड्डा करून त्यात मलमूत्र साठवा जेणेकरून डास होणार नाहीत.
2) जनावरांची स्वच्छता
दुधाची धार काढण्यापूर्वी जनावरांना पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर शिफारशीत जंतुनाशकाच्या (Disinfectant) द्रावणाने कास व कासेजवळील भाग, सड स्वच्छ धुवा कोरड्या फडक्याने कास पुसून घ्या. जेणेकरून कास व कासेच्या भागातील बारीक केस, धूळ दुधात पडणार नाही.
महत्वाच्या बातम्या
महत्वाची बातमी! शेतजमीन विकल्यास शेतकऱ्यांना भरावा लागणार 'इतका' टॅक्स; वाचा सविस्तर
'या' योजनेत फक्त 100 रुपयांपासून पैसे जमा करा; मॅच्युरिटीनंतर 16 लाख रुपये मिळतील
गुगल देतंय 25 लाख रुपये कमविण्याची मोठी संधी; फक्त 'हे' काम करावे लागणार
Share your comments