प्राण्यांमधील माणुसकीचा आपल्याला कित्येक वेळा प्रत्येय आलाय. आजकाल लोक माणसापेक्षा सगळ्यात जास्त जीव प्राण्याला लावताना दिसतात. प्राण्यांमधील माणुसकी आणि आपुलकीचे सत्य कुणीच टाळू शकत नाही. सोशल मीडिया वर तर कितीतरी प्राण्यांच्या प्रामाणिकपणाची तसेच निस्वार्थी जीव लावण्याचे कितीतरी विडिओ वायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडिया वर वायरल झाला आहे. त्या गोड फोटोला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
क्युट फोटोवर नेटकरी फिदा
हा फोटो प्रचंड प्रमाणावर वायरल होत आहे. वादळ आलं आणि मांजराची इवलुशी पिल्लं घाबरून जातात. घाबरून कोंबडीच्या पंखाखाली जाऊन बसतात. आणि कोंबडी देखील त्यांना संरक्षण देते. या फोटोवर कितीतरी कमेंट्स आल्या असून नेटकऱ्यांना हे दृश्य फारच आवडलंय. अर्थात इतका सुंदर आणि माणुसकीचं दर्शन घडवणारा फोटो कुणाला नाही आवडणार.
शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी होणार ऐतिहासिक कांदा परिषद
एखादा प्राणी आपल्या पिल्लांचे संरक्षण करतानाचे कितीतरी विडिओ सोशल मीडियावर वायरल होताना आपण बघतो. मात्र इथे कोंबडीने मांजरीच्या पिल्लांना दिलेला आसरा बघण्यासारखा आहे. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला मदत करतानाचा हा फोटो कमालीचा वाटतो. कोंबडीची मांजरीच्या पिल्लांविषयी असलेली माणुसकी पाहून लोक प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. वादळ आलं म्हणून मांजरीची पिल्लं घाबरली आणि कोंबडीने माणुसकी दाखवत पंखाखाली त्यांना आसरा दिलाय. या गोड फोटोला सगळ्यांनी पसंती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
आता मोंदींचे 2 हजार थेट तुमच्या घरी येणार; बँकेत जाण्याचा त्रासही मिटणार
"जिवाचा आटापिटा करून पाणी आणावं लागतंय"; आमची व्यथा कधी सुटणार?
Share your comments