MFOI 2024 Road Show
  1. पशुधन

'लम्पी स्कीन'ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीमध्ये बदल; मिळणार इतकी रक्कम

राज्यभरात लंपी रोगाने धुमाकूळ घातल्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून रोगाला अटकाव घालण्याच्या प्रयत्न होत आहे. यासह या आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या ठराविक संख्येइतक्या जनावरांनाच नुकसानभरपाई दिली जात होती.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

राज्यभरात लंपी रोगाने (Lumpy disease) धुमाकूळ घातल्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून रोगाला अटकाव घालण्याच्या प्रयत्न होत आहे. यासह या आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या ठराविक संख्येइतक्या जनावरांनाच नुकसानभरपाई दिली जात होती.

आता त्यात बदल करत संख्येचे निर्बंध दूर करून जितकी जनावरे 'लम्पी स्कीन'ने दगावतील तितक्या जनावरांना नुकसानभरपाई मिळणार आहे. ही माहिती पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंग यांनी मंगळवारी (ता. 4) दिली आहे.

लम्‍पीची साथ आल्यानंतर मृत पावलेल्या जनावरांबाबत संबंधित पशुपालकांना अर्थसाह्य देण्याचे आदेश शासनाने दिले होते. परंतु जे पशुपालक (Cattle breeder) हे अल्‍प भूधारक, अत्यल्‍प भूधारक आहेत, त्‍यांनाच हा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

'या' राशींना लागणार मोठी लॉटरी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

तसेच हा लाभ केवळ एका शेतकऱ्या‍साठी तीन जनावरांच्या मृत्यूपर्यंतच होता. या शासन निर्णयात आता बदल करण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार, सर्व शेतकरी (farmers) व पशुपालकांना या निर्णयाचा लाभ होईल. तसेच जनावरांच्या संख्येवर घातलेली मर्यादाही उठवण्याचा महत्त्‍व‍पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

सावधान! राज्यात पावसाचा वेग वाढला; हवामान विभागाकडून आज संपूर्ण महाराष्ट्रात 'यलो' अलर्ट जारी

किती मिळणार रक्कम ?

गाय किंवा म्‍हैस लम्‍पी स्कीनने मृत पावल्यास संबंधित पशुपालकास ३० हजार रुपये, ओढकाम करणारी जनावरे, जसे की बैल मृत पावला तर २५ हजार व वासरू असेल तर १६ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.

जितकी जनावरे लम्पी स्कीनने दगावतील तितक्या सर्व जनावरांसाठी (animal) मदत मिळणार आहे. अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे पशुधन मृत पावलेल्या सर्व पशुपालकांना अर्थसाह्य मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 
सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात होणार मोठी वाढ; जाणून घ्या आजचे भाव
जनावरांचे दूध वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केला सर्वोत्तम आहार; 100 टक्के दूध उत्पादनात होणार वाढ
लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर कोणाला मिळणार पैसे? जाणून घ्या सविस्तर

English Summary: Changes animals killed lumpy skin Amount received Published on: 08 October 2022, 01:17 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters