भारत हा कृषिप्रधान देश म्हणून अख्ख्या जगभर ओळखला जातो. देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेती व्यवसाय करून आपली उपजविका करत आहेत. या मध्ये काही सुशिक्षित तरुणांचा समावेश सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. शेती वर अवलंबून राहणे परवडत नसल्यामुळे शेतकरी वर्ग शेतीसंबंधीत असलेले व्यवसाय सुद्धा करून उत्पन्न वाढवत आहेत.
शेतीला पशुपालनाची साथ:-
शेतीसोबत शेती संलग्न व्यवसाय खूप गरजेचे आहेत यांमध्ये तुम्ही शेळीपालन, पशुपालन, मत्स्य शेती, मधुमाशी पालन आणि दुगधव्यवसाय असे अनेक प्रकारचे जोडव्यवसाय करून पैसे कमवू शकता. शेतकरी वर्गाची खरी दौलत ही त्याची जनावरे असतात. स्वतःचा जिवाच्या पलीकडे शेतकरी वर्ग आपल्या जनावरांना जपत असतो त्यांची काळजी घेत असतो.
लम्पी आजार:-
सध्या राज्यात लम्पी या आजाराने डोके वर काढले आहे. जनावरांना मोठ्या प्रमाणात या रोगांची लागण होत आहे. आतापर्यंत राज्यात लम्पी च्या आजाराने 22 पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी च्या वाढत्या रोगाचा परिणाम हा दुगधव्यवसाय यावर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.
लम्पी आजाराची लक्षणे:-
जनावरांच्या गोठ्यातील गोचिड, माश्या, टिक्स यांच्या मार्फत या लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होते. यामुळे जनावरास ताप येतो तर जनावराच्या डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते, ही लक्षणे आपणास दिसून येतात एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान आणि भूक कमी होऊन दुध उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो.
हेही वाचा:-पावसाचा धुवाधार कमबॅक, राज्यात या ठिकाणी जोरदार पाऊस, पुढील 2 दिवस महत्वाचे
लम्पी आजारापासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना:-
आपल्या जनावरांना लम्पी आजारांचा प्रादुर्भावच होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या साठी ज्या जनावराला या आजाराची लागण झाली आहे त्यापासून इतर जनावरे ही दूर ठेवणे गरजेचे आहेत, मोकळी हवा असणे गरजेचं आहे. शिवाय दररोज जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा, गोठ्यामध्ये कपारी नसायला पाहिजेत जेणेकरुन यामध्ये माशा, गोमाश्या आणि गोचीड लपून राहणार नाहीत याची याची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे.
Share your comments