आता या क्षेत्रावर आडसाली लावण करायची आहे. दोनदा नांगरट ,रोटावेटर मारून जमीन एकदम पैलवान केले.ज्या दिवशी सरी सोडायचे होते त्या दिवशी नेमका अवकाळी पाऊस पडला.त्यानंतर 8दिवसांनी वापसा आल्यानंतर सरी सोडली.परंतु पावसाने खोलवर
ओल केल्याने सरी पाडताना सरीच्या तळातील जमीन ट्रॅक्टरच्या चाक जाऊन एकदम दगडासारखे झाले,इतके मशागती चांगले करून देखील पावसात सापडल्याने मनासारखे सरी पडली नाही,रानाच फुल गेल्यासारखं झालं होत.. जमिनीच्या अशा कंडिशन मध्ये ऊसाची लावण करणं संयुक्तिक ठरलं
नसत,जमीन कठीण झाल्याने ऊसाच्या उगवणीवर परिणाम होऊन तुटाळ झाली असते, तसेच ऊसाच्या वाढीवरती सुद्धा परिणाम झाले असते.वर्षभर विश्रांती देऊन सुद्धा काहीच उपयोग होणार नव्हता.त्यासाठी सरीच्या तळातील कठीण भाग फोडणे करणे गरजेचे होते.त्यासाठी सरी मध्ये बैलाच्या औताने दोनदा दुयारणी कावळा दात्री घालून कठीण झालेला भाग फोडून घेतला, व नंतर त्यामध्ये
रीजर् घातले.आता औतं झाल्यामुळें कठीण भाग मऊ झालेला आहे, व आता त्यातून चालताना पाय भरून येतात. आता त्याला पूर्वीसारखे फुल आलेले आहे.आता पाण्याबरोबर लावण करत असताना सर्व कांड्या व्यवस्थित मातीआड होतील, उगवण जलद होईल व ऊसाची पीक जोमाने येईल. शेवटी कुठल्याही पिकाचे उत्पादन जमिनीचे फुल चांगले असल्याशिवाय मिळत नाही.
शेतीनिष्ठ श्री सुरेश कबाडे.
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
मोबा:- 9403725999
Share your comments