1. कृषीपीडिया

होय आली रब्बी ची पेरणी व्हा आता सावध !

शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या आयुष्यातील महत्वाचे दिवस म्हणजे पेरणीचा काळ,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
होय आली रब्बी ची पेरणी व्हा आता सावध !

होय आली रब्बी ची पेरणी व्हा आता सावध !

शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या आयुष्यातील महत्वाचे दिवस म्हणजे पेरणीचा काळ, लगीन घरात जशी लगीनघाई असते तशीच लगबग शेतकऱ्यांना पेरणी काळात असते. पेरणी हा तसा शेतकऱ्यांसाठी केवळ गुंतवणूक आणि उत्पन्न एवढंच विषय नाही तर एक भावनिक नातं आहे. पहिल्या पावसाने ओलीचिंब झालेली काळीमाय. इकडून तिकडे झुळक्या घेणारा वारा. झाडांवर जसा पक्षांचा चिवचिवाट होतो तसा सगळ्या शेत शिवारात शेकऱ्यांनी सर्जा राज्याला मारलेले आरोळीचा आवाज घुमत असतो.

घरातल्या मायमाऊलीने आणलेला चटणीभाकर,कांदा आणि लोणचं,हिरवी शाल पांघरलेल्या बांधावर बसून खाण्याची मजा काही औरचं.

वाचा उन्हाळी सोयाबीन लागवड आणि नियोजन माहिती

मागच्या काही दिवसांपासून वरुणराजा बरसतो आहे. ढगांचे गडगडाट सुरु झाले आहेत.Varunaraja has been raining for the past few days. Thunderstorms have started. त्या सोबतच काळी माय भिजून चिंब होण्यासाठी आतूर आहे. हे सगळं बघायला अनुभवायला जरी मस्त असलं तरी एक वेगळी धग आतून धुमसत आहे. गरम पातेल्यात फोडणी बसावी तसा मिरगाचा थोडा थोडका पावसाचा सडा जेव्हा जमिनीवर पडतो

तेव्हा मातीचा वरचा थर थोडासा ओलसर होतो पण त्या ओलसर थरखाली एक अस्वस्थ थर असतो ज्याला पाण्याची जास्त गरज असते. तशीच अवस्था शेतकऱ्यांची आहे. सर्वत्र पाऊस पडतो आहे म्हणून शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे, पण अनेक अडचणी दारा समोर आ...वासून उभ्या आहेत, खत,बी -बियाणे खरेदी करायची आहेत. त्यामुळे नगदी पैसे जवळ असणं महत्वाचं झालं आहे. मागच्या दोन वर्षात कोरोना मुळे कृषी बाजारपेठ ठप्प होती.त्यामुळे उदारी हा प्रकार बंद पडण्याच्या

मार्गावर आहे. बँका, सोनार, सावकार ,यांच्या दुकानां समोर रांगा लागल्याचं चित्र सर्वदूर पहायला मिळत आहे. कोणी पीक कर्ज उपलब्ध होईल का या आशेवरती आहे,तर कोणी बायकोची दागिने गहाण ठेवण्यासाठी किंवा मोड करण्यासाठी सोनाराच्या दुकानात आहे.ज्यांच्याकडे सोनं, पैसे नाहीत ते सावकारकडे तळ ठोकन आहेत. असे मनाला वेदना देणार चित्र पेरणीच्या काळात सर्वत्र पहायला मिळतं. कोरोना काळात दवाखान्यांनी लुटलं. आता व्यापाऱ्यांची वेळ आली आहे. अनावश्यक खतं, बियाणे ,औषधी ,शेतकऱ्यांच्या माथी मारण्याची स्पर्धा लागली आहे.

                     

VDN AGRO TECH

English Summary: Yes, Rabbi's sowing has come, now be careful! Published on: 06 November 2022, 03:53 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters