1. कृषीपीडिया

कापूस मावा तुडतुडे साठी फवारणीचा अत्यंत उपयुक्त सल्ला

महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाच्या मोठ्या खंडामूळे,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कापूस मावा तुडतुडे साठी फवारणीचा अत्यंत उपयुक्त सल्ला

कापूस मावा तुडतुडे साठी फवारणीचा अत्यंत उपयुक्त सल्ला

महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाच्या मोठ्या खंडामूळे,शेतकरी बंधूंचे डोळे आकाशा कडे लागलेले असतानाच 1 जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात कुठे कमी कुठे अधिक पण पिकांना जीवदान देणारा पाऊस पडला आहे, पडत आहे त्याबद्दल वरून राज्याचे आपण सगळे जण आभारी आहोत.महाराष्ट्रावर जे दुष्काळाचे सावट घोंगावत होते ते दूर झाले हि आनंदाची गोस्ट आहे, पण अजूनही कोरडच्या कपाशीला अधून मधून 3/4 पावसाची आवश्यकता आहेच, आणि तो पडेलच अशी आपण परमकृपाळू परमेश्वराजवळ प्रार्थना करूयात मित्रानो ,सर्व शेतकरी बंधूनी कापूस या पिकाला आपल्या यथाशक्ती खताचे डोस दिले आहेत ,आणि आता यापुढे 4 ते 5 किटनाशक औषधी फवारणी करावी लागणार आहे. ह्या ज्या फवारण्या आपण करणार आहोत त्या मुख्यतः *सेंद्री अळी आणि थ्रीप्स या किडी साठीच असणार आहेत. कारण या दोन

किडी मुळेच कापूस उत्पन्नात जास्त घट येते ,प्रत्येक शेतकरी आपापल्या परीने फवारणी करतीलही.मित्रानो गेल्या 10/12 दिवसापासून आपल्या भगवती सिड्स च्या सर्वच ग्रुप्सवर माहिती येत आहे की ,शेतकरी मावा आणि तुडतुडे या किडीना अक्षरशः वैतागून गेला आहे,आणि ते खरेही आहे.गेल्या 15 /20 दिवसापासून सातत्याने असलेले ढगाळ वातावरण त्याला कारणीभूत आहे,मावा या किडीला हे वातावरण पोषक आहे,शेतकऱ्यांनी 1/2 वेळा रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली तरीही हि कीड आटोक्यात येत नाही . अशा ढगाळ वातावरणात,बऱ्याच शेतकऱ्यांनी मावा आणि तुडतुड्यांच्या बंदोबस्तासाठी सुरुवातीला इमिडक्लारप्राईड या नियोनिकोटींन गटातीलच कीडनाशक फवारले आहे , मावा व तुडतुडे या किडीचे आयुष्य 15/17 दिवसांचे असते,या गटातील औषधाच्या फवारणी मुळे, मावा व तुडतुड्यांची पुढील पिढी अधिक प्रतिकारक्षम जन्माला आली. कापूस फवारणी सल्ला या लेखात मी सांगीतले होते की नियोनिकोटींन गटातील औषध पुन्हा पुन्हा फवारू

नये, आलटून पालटून त्याची फवारणी करा, तरीही शेतकरी पुन्हा पुन्हा त्याच गटातील औषधांची फवारणी करत आहेत.शेतकरी बंधुनो मावा व तुडतुडे हि कीड कापसाच्या पानाच्या खालच्या बाजूला असते ,आणि आपण फवारणी वरच्या बाजूने करतो,व्यवस्थित खालून वरून फवारणी केली /झाड सर्व बाजूनी पूर्ण ओले होईल अशी ,आणि फवारणीत आपण सिलिकॉन स्टिकर 7 मिली वापरले असेल तर मावा व तुडतुडे यांचा खात्मा होतो, थोडक्यात ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित फवारणी केली आहे त्यांच्या कापूस पिकावरचा या किडीचा अटॅक नियंत्रणात आहे, आणि ज्यांची व्यवस्थित फवारणी झाली नाही, त्यांच्या कापसावर विपरीत परिणाम झालेला पाहायला मिळत आहे चुराडा मुरडा आला आहे, कापसाची वाढ खुंटली आहे.बरेच शेतकरी या किडीना अक्षरशः वैतागून गेले,काहींनी तर मला फोनवर असेही विचारले कि या वर्षी कापूस येईल की नाही.मित्रानो मावा आणि तुडतुडे या किळीमुळे कोरडवाहू कापूस 25 जून नंतर लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी एक फवारणी पॉवर/पेट्रोल पंपानेच करावी, फवारणी करताना कापसाचे झाड झटकले गेले पाहिजे इतक्या

प्रेशरने फवारणी झाली पाहिजे. किंवा उलट्या दिशेने फवारणी करावी,माझ्या शेतातही हाच मावा आणि तुडतुड्यांचा अटॅक होता मी खालील प्रमाणे फवारणी चा प्रयोग करून पहिला मावा तुडतुड्यांचा अटॅक 90 ते 95 % कमी झाला.खाली दिलेल्या 2 प्रकारच्या कीडनाशक फवारणी पैकी कोणतीही एक फवारणी करा.1) रोंफेन 30 मिलीथ्रीप्सील 15 मिली (ऑरगॅनिक आहे, थ्रीप्स असले तरच घ्यावे)स्टिकर 5 मिलीनिम अर्क 30 ते 40 मिली2) असिफेट 30 ग्रॅमस्टिकर 7मिलीफिप्रोनिल 25 मिली(थ्रीप्स असतील तर घ्या)निमार्क 20% चे 40 मिलीवरील 1 नंबरची फवारणी मी माझ्या शेतात उलट्या नोझलने केली ,म्हणजे नोझलचे तोंड जमिनीकडे न ठेवता, आकाशाकडे नोझलचे तोंड होते ,त्यामुळे पानाच्या खालच्या बाजूने पूर्ण पान ओले होत होते.व फवारणी करताना एकाच ओळीत चालत चालत फवारणी केली होती.कापूस वन वे आहे.वरील कीड नाशकांची ,फवारणी वर सांगितल्या प्रमाणे करा मावा तुडतुड्यांचा अटॅक निश्चितच कमी होईल ,प्रयोग करून पहा.

 

शिंदे सर

9822308252

English Summary: Very useful spray tip for cotton boll weevil Published on: 17 July 2022, 03:43 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters