निंबोळी पावडर मध्ये ऑझाडीरेक्टीन घटक असल्यामुळे मातीमधील हुमणी, खोडकीड, कटवर्म, वाळवी विषाणु, बुरशी या शत्रूकिटकां-रोगांचा ते नायनाट करते.निंबोळी पावडर हे संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणुंना हानी पोहचत नाही.
– निंबोळी पावडर हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतांमधील नत्र टिकून राहते.– निंबोळी पावडर पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून १००% संरक्षण करते.Nimboli powder provides 100% protection of crops against micro-worms, nematodes.–निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.– निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत.
यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.– निंबोळी पावडर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच मातीमधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते.– निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू चांगला राखला जातो. परिणामी ऊत्पादन व गुणवत्ता वाढते.
निंबोळी पावडरच्या वापराचे प्रमाण –सर्व पिकांमध्ये वापरास योग्य असणारी ही निंबोळी पावडर एकरी १५० किग्रॅ वापरण्याची शिफारस आहे.फळबागेमध्ये वापर करायचा असल्यास २०० ग्रॅम प्रति झाड(१ वर्ष) या प्रमाणामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत द्यावे.सेंद्रिय,रेसिड्यूफ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक, रासायनिक इ. सर्व शेती प्रकारामध्ये वापराकरिता पूर्ण सुरक्षित आहे.
शरद केशवराव बोंडे.
9404075628
Share your comments