1. कृषीपीडिया

अळू लागवडीचे हे तंत्र वापरा आणि कमवा बक्कळ पैसा

अळू लागवड जून महिन्यात करावी. सरीमध्ये ९० सें.मी. अंतर ठेवून कंद लावून मातीने झाकावेत.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
अळू लागवडीचे हे तंत्र वापरा आणि कमवा बक्कळ पैसा

अळू लागवडीचे हे तंत्र वापरा आणि कमवा बक्कळ पैसा

अळू लागवड जून महिन्यात करावी. सरीमध्ये ९० सें.मी. अंतर ठेवून कंद लावून मातीने झाकावेत. ताबडतोब पाणी द्यावे. कोकण हरितपर्णी, श्री किरण, श्री रश्मी, श्री पल्लवी, सातमुखी आणि पंचमुखी या जाती चांगले उत्पादन देतात. अळू लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. योग्य मशागत करून जमीन तयार करावी. हे पीक कंदासाठी लावले असेल तर सहा महिने झाल्यावर काढणी करावी. पानांची काढणी २.५ ते ३ महिन्यांत करतात. त्यामुळे लागवड क्षेत्रावर पाण्याची सतत उपलब्धता असावी. जमीन चांगली नांगरून भुसभुशीत करावी. जमिनीत शेणखत मिसळून तीन फुटांवर सरी वरंबे काढावेत. 

लागवड जून महिन्यात करावी. लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिमची (१ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाणी ) बेणे प्रक्रिया करावी. सरीमध्ये ९० सें.मी. अंतर ठेवून कंद लावून मातीने झाकावेत. ताबडतोब पाणी द्यावे.त्यानंतर आवश्यकतेनुसार ३ ते ४ दिवसाने पाणी द्यावे. साधारणपणे एक गुंठ्यासाठी १२० ते १३० कंद लागतात. लागवडीपूर्वी शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. माती परीक्षणानुसार हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ८० किलो पालाश द्यावे. नत्र व पालाश खत समान तीन हफ्त्यात विभागून द्यावे. स्फुरद लागवडीच्या वेळी द्यावे.काहीवेळा पिकावर करपा, कोंब कुजणे रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. नियंत्रणात्मक उपाययोजना म्हणून १ टक्के बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.

पानांची विक्री करायची असल्यास दोन ते अडीच महिन्यांनी तोडणी करावी. पाने देठासहित तोडावीत. पानांची तोडणी ८ ते ९ महिने करू शकतो. अळू कंदासाठी उपयोगात आणायचे असल्यास सहा महिन्यांमध्ये कंद तयार होतात. त्यानंतर काढणी करावी.जातींची निवड - लागवडीसाठी प्रामुख्याने स्थानिक जातींची लागवड केली जाते. यामध्ये गर्द हिरवी पाने, जांभळसर शिरा व दांडे किंवा फिकट हिरवी पाने असे प्रकार आहेत. अळूचे कंद भाजून अथवा उकडून खातात.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने लागवडीसाठी कोकण हरितपर्णी ही जात निवड पद्धतीने विकसित केली आहे. 

या जातीची पाने कोवळी असताना भाजीसाठी वापरतात तसेच मोठी पाने वडीसाठी वापरतात. या जातीमध्ये घशाला खवखव करणारा घटक खूपच कमी असल्याने भाजी तसेच शिजवल्याले कंद खाल्यावर घसा खवखवत नाही. या जातीचे हेक्टरी कंदाचे उत्पादन ५ ते ६ टन व पानाचे देठासहित ८ ते ९ टन मिळते. वडी करताना पान फाटत नाही. अळुच्या श्री किरण, श्री रश्मी, श्री पल्लवी, सातमुखी आणि पंचमुखी या जातीदेखील चांगले उत्पादन देतात. कंदामधील घटक - पाण्याचे शेकडा प्रमाण ७० ते ७७ टक्के, कर्बोदके १७ ते २६ टक्के, प्रथिने १.३ ते ३.७ टक्के, स्निंग्धाश ०.२ ते ०.४ टक्के आणि तंतू ०.६ ते १.९ टक्के.लोह, चुना हे क्षार आणि अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात.  

       

शेतकरी हितार्थ

विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

९९२३१३२२३३

English Summary: Use this technique of aloo cultivation and earn a lot of money Published on: 07 July 2022, 08:39 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters