जमिनीची सुपीकता वाढावी म्हणून सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक असला त्यासाठी कंपोस्ट खत, शेणखत याची आवश्यकता असते. परंतु यांना पर्यायी उपाय म्हणून ऊस साखर कारखान्यातून उपलब्ध होणारी घट्टमळी म्हणजेच प्रेसमड केक जमिनीत वापरकरणे फायद्याचे ठरते. या लेखात आपण ऊस मळीचे शेतासाठी होणारे फायदे बघू.
उसाची मळी ( प्रेस मड केक)
- साखरकारखान्यांमध्येसाखरतयारहोतानास्पेंटवॉश,बगॅस व प्रेसमड इत्यादी उपपदार्थ तयार होतात. जवळ जवळ एक टन उसापासून साधारणतः 110 ते 120 किलो साखर, चाळीस किलो स्पेंट वॉश म्हणजे मळी, 30 ते 40 किलो प्रेसमड केक व 300 किलो बगॅसचे उत्पादन होते.
- या सगळ्या उपपदार्थांची मध्ये प्रेसमड केक चा उपयोग सेंद्रिय खत व भूसुधारक म्हणून चांगला होऊ शकतो.
- साखर कारखान्यांमध्ये रस शुद्ध करण्यासाठी जी गाळण्याची प्रक्रिया होते त्यामध्ये अशुद्ध पदार्थांचा जो चोथा राहतो, त्याला प्रेसमड किंवा फिल्टर केक म्हणतात.
- कारखान्यांमध्ये गाळप केलेल्या उसाच्या तीन टक्के प्रेसमड मिळते. म्हणजेच 100 टन उसाचे गाळप केले तर त्यापासून तीन टन प्रेसमड मिळते.
- प्रेसमड चे रासायनिक पृथक्करण केल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे 1.5 ते 1.7 टक्के नत्र,2.4 ते 2.6 टक्के स्फुरद,1.0 ते 1.4 टक्के पालाश आणि दोन ते 2.3 टक्के गंधक ही पोषण अन्नद्रव्ये असतात. प्रेसमड मध्ये गंधकाचे प्रमाण हे दोन ते 2.3 टक्के असल्याने चोपण जमीन सुधारणा देखील प्रेस मड चा उपयोग होतो.
प्रेसमड जमिनीत वापरतांना घ्यावयाची काळजी
- प्रेसमड जमिनीत वापरण्यापूर्वी किंवा वापरतानादक्षता घ्यावी. कारखान्यात तयार झालेली प्रेसमडलगेच पिकांसाठी वापरू नये
- प्रेस मडमध्ये मेनाचे प्रमाण आठ ते नऊ टक्के असल्याने ते जमिनीत कुजण्यासाठी वेळ लागतो. म्हणून उसाची लागण करण्यापूर्वी कमीत कमी एक ते दोन महिने अगोदर प्रेसमड जमिनीत पहिल्या नांगरणी नंतर घालावी आणि दुसरी नागरणी करून जमिनीत मिसळून घ्यावे. प्रत्येक वर्षी एकाच शेतात राजा प्रेसमड चा वापर न करता दोन वर्षातून एकदाच करावा.
- कंपोस्टटेड प्रेसमड दरवर्षी वापरली तरी चालते. भारी खोल जमिनीत दर वर्षी प्रेसमड केक वापरल्याने जमिनीतील 25 ते 30 सेंटिमीटर खोलीवर घट्ट थर तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे जमिनीतील जादा पाण्याचा निचरा चांगला होत नाही.
प्रेसमड कंपोस्ट खत
साखर कारखान्यात तयार होणाऱ्या उप पदार्थांपैकी तयार होणारे एक खत म्हणजे प्रेसमड कंपोस्ट खतहे होय. हे खत प्रेसमड व स्पेंट वॉशयोग्य प्रमाणात मिसळून तयार केले जाते. अशा प्रकारच्या कंपोस्ट चे रासायनिक गुणधर्म, त्याची उसासाठी उपयुक्तता व जमीनीवर होणारे परिणाम इत्यादी बाबतीतपाडेगाव येथील संशोधनात असे दिसले की, पूर्वहंगामी उसासाठी 400-170-170 किलो प्रति हेक्टर नत्र-स्फुरद– पालाश व दहा टन शेणखत प्रति हेक्टरी वापरण्याऐवजी 325-100-120 किलो प्रतिहेक्टरी नत्र –स्फुरद– पालाश+ 75 टन प्रति हेक्टरी प्रेसमड कंपोस्ट वापरले तर नत्र, स्फुरदव पालाश मध्ये अनुक्रमे 75, 70 व50 किलोहेक्टरी बचत होते.( संकलन- कृषीसमर्पण समूह )
Share your comments