1. कृषीपीडिया

अशी करावी फायद्याची करडई लागवड

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
अशी करावी फायद्याची करडई लागवड

अशी करावी फायद्याची करडई लागवड

महाराष्ट्र राज्याचे विशेषतः रब्बी हंगामातील करडई हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. रब्बीत पाण्याचा ताण पडला, तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते. कारण या पिकाच्या मुळ्या जमीनीत १४० ते १५० सेंटिमीटर खोलवर जाऊन ओलावा शोषून घेतात. करडईच्या तेलात संपृक्त स्निग्ध आम्लांचे प्रमाण इतर तेलांपेक्षा बरेच कमी असते. त्यामुळे

हृदयरोग्यांना हे तेल वापरणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.Using this oil is beneficial for heart patients. शरीरात रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा प्रमाणाबाहेर वाढू नये,

शेतकरी बांधवांना कमी खर्चात जास्त उत्पादन, शेतकऱ्यांना "मल्टिप्लायर तंत्रज्ञान वरदान"

म्हणून इतर तेलांबरोबर या तेलाचा उपयोग करणे फायदेशीर आहे. म्हणूनच करडईच्या तेलाची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.लागवड तंत्रज्ञान : जमीन : पिकास मध्यम ते भारी

खोल जमीन वापरावी. साठ सेंटिमीटरपेक्षा जास्त खोल जमिनीत करडईचे पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि ओलावा टिकवून ठेवणारी असावी. पाणी साचून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो. थोड्या फार चोपण जमिनीतही हे पीक येऊ शकते.पूर्वमशागत : पिकाची मुळे खोल जात असल्यामुळे

खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३-४ पाळ्या द्याव्यात. खरीप हंगामात ६ × ६ मीटर अथवा १० × १० मीटर आकाराचे सपाट वाफे किंवा सरी- वरंबे तयार करून मूलस्थानी जलसंधारण करावे. शेवटच्या पाळीअगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्‍टरी ६.२५ टन (१२ ते १३ गाड्या) मिसळून पाळी द्यावी.

 

डॉ. विजय अमृतसागर, डॉ. शहाजी शिंदे,

अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, 

English Summary: This should be beneficial sorghum cultivation Published on: 06 October 2022, 08:03 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters