1. कृषीपीडिया

मनातल्या प्रश्नाचे उत्तर! फवारणी करत आहात आणि पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी का? वाचा उत्तर

पावसाळ्यामध्ये इतर हंगामाच्या तुलनेत रोगराईचा आणि किडींचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे शेतकरी बंधू रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करतात. परंतु हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असतो. बऱ्याचदा असे होते की फवारणी सुरू असते व मध्येच पावसाचे आगमन होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
sprey on crop

sprey on crop

पावसाळ्यामध्ये इतर हंगामाच्या तुलनेत रोगराईचा आणि किडींचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे शेतकरी बंधू  रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करतात. परंतु हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे  कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असतो. बऱ्याचदा असे होते की फवारणी सुरू असते व मध्येच पावसाचे आगमन होते.

अशावेळी जर फवारणी सुरू असेल आणि पाऊस आला तर फवारणीचे काम अर्ध्यावर थांबवावे लागते, त्यावेळी मनामध्ये प्रश्न पडतो की जी काही फवारणी झालेली असते त्या फवारणी झालेल्या  क्षेत्रात परत फवारणी करावी की करू नये, हा प्रश्न सगळ्यांना पडतो.  या सगळ्या परिस्थितीविषयी आपण या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:Rain Damage Crop: काय सांगता! पावसामुळे शेतीचे होणारे नुकसान टळणार; फक्त 'या' पद्धतींचा वापर करा

फवारणी परत करावी की नाही हे खालील घटकांवर अवलंबून

1- फवारणी नंतर किती वेळाने पाऊस आला?- साधारण जर आपण एक अंदाज पकडला तर फवारणी झाल्यानंतर तीन ते चार तासांपर्यंत पाऊस नको यायला.

परंतु तसे झाले तर तुम्ही फवारलेले रसायन हे जर आंतरप्रवाही असेल तर ते तीन ते चार तासात शोषली जातात व कीटकनाशक जर स्पर्शीय असतील तर कीटक व किडींवर 50 ते 60 टक्के परिणाम केलेला असतो, त्यामुळे पुन्हा फवारणी करण्याची गरज राहत नाही.

2- रसायनांच्या स्वरूप महत्त्वाचे- आता यासाठी तुम्ही फवारणी करतानाकोणत्या प्रकारच्या रसायनांची फवारणी केली त्यांच्यावर देखील गोष्ट अवलंबून असते.

उदाहरणार्थ जर तुम्ही असिफेट सारखे रसायन फवारले असेल तर त्याचा अपेक्षित परिणाम यायला 12 ते 14 तास लागतात. त्यामुळे जर पाऊस सुरू असेल तर असिफेटची फवारणी करणे शक्यतो टाळावे.

नक्की वाचा:वाचा अत्यंत महत्त्वाचे भूईमूग पिक आणि भयानक हुमणी चे व्यवस्थापन

3-पाऊस किती तीव्रतेचा आहे?- फवारणी झाल्यानंतर लगेच 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ रिमझिम पाऊस चालला तर 50 ते 60 टक्के फवारा हा धुतला जातो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा फवारणी घेणे गरजेचे असते. समजा तुमची फवारणी झाल्यानंतर एक तासाचा कालावधी नंतर जर 15 ते 20 मिनिटांसाठी रिमझिम पाऊस आला तर तिसर्‍या दिवशी फवारणी केली तरी चालते.

याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस पडत असताना पडणाऱ्या पावसाचा थेंबाचा आकार मध्यम किंवा मोठा असेल आणि फवारणी झाल्यानंतर लगेचच 15 ते 20 मिनिटे चांगला पाऊस चालला तर 95% फवारा तुमचा वाया जातो.

अशावेळी हवामानाचा अंदाज बघून वातावरण निवळले तर दोन तीन तासानंतर फवारणी करावी. पावसाळ्यामध्ये फवारणी करायची असेल तर शक्यतो ती सकाळच्या वेळेस करणे खूप चांगले.

नक्की वाचा:पुढील दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट

English Summary: take precaution of when sprey crop in rainy session for more result Published on: 04 August 2022, 10:24 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters