आपण आपल्या शेती ची उत्पादकता का घटली असेल या बाबत आपण जाणून घेऊ या आपण शेती करतो पण आपल्या शेतकर्यांच्या शेती व्यवसायाला अभ्यासाचा आधार नसतोच हे मान्य करावे लागेल. त्यामुळे काय होते की आपल्या शेतीमधे जास्तीत जास्त किती उत्पन्न निघू शकते आणि आपण किती उत्पन्न काढतो याचा आपन कधी तुलनात्मक विचारच केला नाही. आपला भारत देश हा कृषि प्रधान देश आहे पण या देशाचा दर एकरी उत्पन्नाच्या बाबतीत जगात फार खालच्या क्रमांक वर आहे. आपन वाहतो त्या शेतीची स्थिती अनुकूल असूनही आपन अभ्यास करून व शास्त्रशुद्ध रित्या शेती केली जात नसल्याने ही अवस्था निर्माण झालेली आहे.
या बाबत आपन विचार केला तर पाश्चिमात्य देशात एकरी उत्पादन आपल्या तिप्पट आहे जर ध्यानात घेतले तर आपले डोळे उघडतील. दर एकरी उत्पन्नाचं भरपूर आहे. त्यानुसार भारतात सोयाबीन एकरी उत्पादन आठ क्विंटल आहे. तेच उत्पन्न जपान मध्ये मात्र एकरी २५ क्विंटल आहे. The same yield in Japan is 25 quintal per acre.या बाबतीत जगातल्या काही प्रमुख कृषि प्रधान देशांचा तुलनात्मक अभ्यास केला तर असे लक्षात येईल की आपन याबाबत सर्वात मागे आहे. सगळे आकडे पाहिले म्हणजे आपण या संदर्भात किती मागे आहोत याचा बोध होतो. आपल्या देशात पाणी कमी आहे, आपल्या देशातली हवा चांंगली नाही, आपल्या देशात खतांचा तुटवडा आहे असे काही नाही. जगात शेतीत असे भरपूर उत्पन्न काढणारे देश आणि या यादीत सर्वात खाली असलेला भारत देश यांच्या हवामानात, पाण्याच्या उपलब्धतेत कसलाही फरक नाही.उलट
इस्रायल सारखा वाळवंटातला देेश याबाबत आपल्या पेक्षा आघाडीवर आहे. अनेकदा आपल्या देशातले शेतकरी पावसाच्या नावाने बोटे मोडताना दिसतात. पावसाळा लहरी झाला आहे. पडला तर पडतो नाही तर गुुंगारा देऊन जातो म्हणून आपली अवस्था वाईट आहे असे बहाणे सांगितले जातात पण, इस्रायल मध्ये तर वर्षानुवर्षे अत्यल्प पाऊस पडत असतो. तिथे १० इंचा पेक्षा अधिक पाऊस कधी पडतच नाही. अशी स्थिती असूनही तिथला शेतकरी ५० इंच पाऊस पडणार्या भारतातल्या शेतकर्यांपेक्षा चांगले उत्पन्न काढतो. तो जास्त माल तर पिकवतोच पण तो दर्जेदार असून सार्या जगात पाठवला जात असतो. याबाबतीत काही शेतकरी काही विशेष प्रयत्न करताना दिसतात पण त्यांची मजल हेक्टरी ५० टनांच्या पुढे जात नाही. इस्रायल सारखा वाळवंटी
देश मात्र टोमॅटोचे उत्पादन हेक्टरी ३०० ते ४००टन एवढे काढत असतो. आपल्या आणि त्यांच्या उत्पन्नातला हा फार आपल्याला विचार करायला लावणारा आहे. आज अमेरिका हा जगातला सर्वात श्रीमंत देश झाला आहे. अमेरिकेतल्या जमिनीला निसर्गाने काही विशेष दान दिले आहे असे काही नाही. अमेरिका आणि भारत यांची हवामान आणि पाऊस याबाबत सर्वसाधारणत: सारखीच स्थिती आहे. आपण शेती करताना निदान आपल्याला हे आकडे तरी माहीत असावेत. तेवढे उत्पादन काढण्याचा प्रयत्न करणे वगैरे पुढचे प्रकार आहेत पण पहिल्या पायरीवर आपल्याला निदान एवढे तरी माहीत असायला हरकत नाही की जगात काही पुढारलेल्या देशातले दर एकरी उत्पादन भारताच्या किमान तिप्पट आहे ही बाब आपल्या साठी लाजीरवाणी आहे.
milindgode111@gmail.com.
मिलिंद जि गोदे
mission agriculture soil information
Share your comments