पिकांच्या निकोप वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी वेगवेगळ्या पोषक घटकांची आवश्यकता असते.यामध्ये मुख्य अन्नद्रव्य जसे की नत्र,स्फुरद आणि पालाश त्यांचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहे. परंतु यासोबतच काही दुय्यम अन्नद्रव्य जसे की त्यांना आपण सुक्ष्म अन्नद्रव्य असे देखील म्हणतो त्यांची देखील आवश्यकता पिकांना असते. वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांच्या माध्यमातून आणि विद्राव्य खतांच्या माध्यमातून आपण पिकांची पोषक तत्वांची गरज पूर्ण करतो.
परंतु खते देताना त्या देण्याच्या पद्धती आणि प्रमाण एवढेच नाही तर जमिनीचे गुणधर्म पाहणे देखील तितकेच गरजेचे असते. या लेखामध्ये आपण पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्याच्या पद्धती आणि इतर काही महत्वाच्या गोष्टी पाहू.
पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याच्या पद्धती
1- फवारणीच्या माध्यमातून-आपण वेगळ्या प्रकारच्या फवारण्या पिकांना करतो.या फवारणीच्या माध्यमातूनच सुक्ष्म अन्नद्रव्य पिकांना देणे फायद्याचे ठरते.
शेतकरी सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीद्वारे देतात परंतु ते देताना तुम्ही बनवलेल्या द्रावणाचा सामू आमल किंवा अल्कधर्मीय असू नये.तसे असेल तर अशा द्रावणामध्ये चुन्याचे योग्य प्रमाण वापरणे गरजेचे असते. तसेच पिकांची गरज ओळखूनच सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या द्रावणाची तीव्रता असावी.
2- जमिनीच्या माध्यमातून- रासायनिक खते किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे अगोदर मातीचे परीक्षण केले तर खुप उत्तम असते. माती परीक्षण करूनच जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण निश्चित करण्यास मदत होते व त्या दृष्टिकोनातून वापर करावा लागतो.जे सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात असतात, यांचा पुरवठा जमिनीतून खताद्वारे केला जातो.
3- बियाणे लागवडीपूर्वी वापर- बियाण्याची लागवड किंवा पेरणी करणे अगोदर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे द्रावण तयार करून बियाण्यावर लावले जाते. परंतु ही पद्धत वापरली तर अन्नद्रव्यांचा पुरवठा खूप कमी प्रमाणात होतो.
यामध्ये जर आपण तांबे व जस्त यासारख्या अन्नद्रव्यांचा विचार केला तर हे जमिनीतून देणे योग्य ठरते. त्यासोबतच बोरॉन, मॉलिब्डेनम किंवा मॅगँनीज तसेच लोह यांच्या शिफारशीनुसार फवारणीद्वारे पुरवठा करणे फायद्याचे ठरते.
तुम्ही पीक लागवड करत असलेली जमीन जर सेंद्रिय कर्ब कमी असलेल्या असेल किंवा चुनखडीयुक्त असेल तर अशा जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा हा जास्त करावा. कारण जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा अन्नद्रव्यांचा पुरवठा चे प्रमाण वाढवावे लागते.
जमीन जर हलकी किंवा वाळूमिश्रित असेल तर अशा जमिनीमध्ये बोरॉन आणि लोह तसेच जस्त यांचे प्रमाण वाढवावे लागते कारण अशा जमिनीमध्ये या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक असते.
Share your comments