1. कृषीपीडिया

Agri Advice: करायची फायदेशीर शेती तर कृषी शास्त्रज्ञांचा वाचा 'हा' सल्ला, 'या' गोष्टींकडे या आठवड्यात द्या लक्ष

सध्या खरिपाच्या पेरण्या बऱ्याच अंशी पूर्ण झाले असूनवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड करण्याचा देखील हा कालावधी आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस पडत असून त्या दृष्टिकोनातून कृषी शास्त्रज्ञांचा देण्यात आलेला सल्ला खूप महत्त्वाचा असतो. या सल्ल्यामागे मोठे काहीतरी नसून अगदी छोट्या छोट्या करायचा काही गोष्टी आहेत, परंतु त्यांचा सर्वात पीक व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी शास्त्रज्ञांचा काय सल्ला आहे ते आपण पाहू.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
important agri advice to farmer for crop management in this week

important agri advice to farmer for crop management in this week

सध्या खरिपाच्या पेरण्या बऱ्याच अंशी पूर्ण झाले असूनवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड करण्याचा देखील हा कालावधी आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस पडत असून त्या दृष्टिकोनातून कृषी शास्त्रज्ञांचा देण्यात आलेला सल्ला खूप महत्त्वाचा असतो. या सल्ल्यामागे मोठे काहीतरी नसून अगदी छोट्या छोट्या करायचा काही गोष्टी आहेत, परंतु त्यांचा सर्वात पीक व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून  महत्त्वाचे आहेत. या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी शास्त्रज्ञांचा काय सल्ला आहे ते आपण पाहू.

कृषी शास्त्रज्ञाचा महत्त्वपूर्ण सल्ला

 1-भात पीक-पुसाच्या कृषी शास्त्रज्ञांनी या आठवड्यासाठी जारी केलेल्या नवीन सल्या मध्ये म्हटले आहे की, भात लागवड करताना पिकामध्ये किमान अडीच सेंटीमीटर पाणी असले पाहिजे.

तसेच दोन ओळींमधील अंतर वीस सेंटीमीटर आणि दोन रोपांतील अंतर दहा सेंटिमीटर ठेवणे गरजेचे आहे. भात पिकाला खतांची मात्रा देताना 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 40 किलो पालाश आणि 25 किलो झिंक सल्फेट प्रति हेक्‍टरी देणे गरजेचे आहे.

तसेच निळ्या हरित शेवाळाचे प्रति एकर एक पॅकेट अशा शेतात वापर आज येथे पाणी जास्त आहे. जेणेकरून शेतातील नत्राचे प्रमाण वाढवता येईल.

नक्की वाचा:सोयाबीन पिकामध्ये कोणती आंतरपिके सापळा पिके घ्यावीत? ते कसे काम करतील जाणून घ्या, खर्च वाचेल

2- मका- सध्याचे  हवामान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सरीच्या कड्यावर मका ची लागवड केली पाहिजे. तुम्ही एएच 421 आणि एएच 58 या संकरीत वाणांची आणि पुसा कंपोझिट 3,पुसा कंपोझिट 4 आणि इतर संकरित वाणाची लागवड करू शकतात. 

हेक्टरी बीयाण्याचे प्रमाण 20 किलो ठेवणे गरजेचे असून दोन ओळींमधील अंतर 60 ते 75 सेंटी मीटर ठेवावे आणि दोन रोपांमधील अंतर18 ते 25 सेंटीमीटर दरम्यान असावे.मक्यावरील तणनियंत्रणासाठी ऍट्राझीन एक ते दीड किलो प्रति हेक्‍टरी 800 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

3- मिरची आणि फुलकोबी लागवडीची उत्तम वेळ- ज्या शेतकऱ्यांनी मिरची, वांगी आणि लवकर फुल कोबीची रोपवाटिका तयार केली आहे त्यांनी हवामान लक्षात घेऊन उथळ वाफ्यावर रोप लागवड करावी. तसेच शेतामध्ये जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

पाणी जास्त प्रमाणात साचल्यास त्याचा निचरा करण्याची व्यवस्था करून घ्यावी. भोपळा लागवड केली असेल तर पावसाळ्यातील पिकांमध्ये हानीकारक कीटक आणि रोगांचे व्यवस्थित निरीक्षण करावे आणि वेली वाढवण्याची व्यवस्थित व्यवस्था करावी. जेणेकरून वेलवर्गीय भाज्यांच्या वेली पावसामुळे कुजण्यपासून वाचवता येतील.

नक्की वाचा:Cotton Production: कापूस संशोधन संस्थेचा मोठा निर्णय; आता कापसाच्या उत्पादनात होणार वाढ

4- हॉपर पासून पिकांचे संरक्षण- या हंगामात शेतकरी गवार, चवळी, भेंडी, सोयाबीन, पालक इत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करू शकतात. प्रमाणित स्त्रोतांकडून बियाणे खरेदी करावे. तसेच बियाण्यावर बीजप्रक्रिया केल्या नंतरच लागवड करावी किंवा पेरणी करावी.

यावेळी शेतकरी मुळा, पालक आणि कोथिंबिरीची देखील लागवड करू शकतात. तसेच मिरची आणि भेंडी लागवड केली गेली असेल तर या पिकांमध्ये माइट्स, जॅसिड्स आणि हॉफरचे सतत निरीक्षण ठेवावे.

नक्की वाचा:अवशेष मुक्त भाजीपाला उत्पादनामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत?

English Summary: important agri advice to farmer for crop management in this week Published on: 27 July 2022, 11:07 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters