1. कृषीपीडिया

Onion Fertilizer Management: कांदा पुनर्लागवडीनंतर 'अशा' प्रकारचे अन्नद्रव्य व्यवस्थापन देईल कांद्याचे बंपर उत्पादन, वाचा डिटेल्स

पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे पिकापासून मिळणाऱ्या उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे असते. कारण जर अन्नद्रव्ये पिकाला पोषक आणि भरपूर प्रमाणात मिळाले तर नक्कीच पिकांच्या उत्पादनात वाढ होते. जर आपण कांदा पिकाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी कांद्याची लागवड केली जाते. परंतु बरेचसे शेतकरी बंधू अगोदर पासून जी काही रासायनिक खते देण्याची पद्धत आहे तीच जास्त करून वापरतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
onion crop fertilizer management

onion crop fertilizer management

 पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे पिकापासून मिळणाऱ्या उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे असते. कारण जर अन्नद्रव्ये पिकाला पोषक आणि भरपूर प्रमाणात मिळाले तर नक्कीच पिकांच्या उत्पादनात वाढ होते. जर आपण कांदा पिकाचा विचार केला तर  महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी कांद्याची लागवड केली जाते. परंतु बरेचसे शेतकरी बंधू अगोदर पासून जी काही रासायनिक खते देण्याची पद्धत आहे तीच जास्त करून वापरतात.

परंतु पिकाची गरज आणि नेमके लागणारी खते अशा पद्धतीने व्यवस्थापन केले तर कांदा पिकाला आवश्‍यक असणारे खतांचा पुरवठा देखील होतो आणि खतावर होणारा अनावश्यक खर्च देखील टळतो. या लेखामध्ये आपण कांद्याची पुनर्लागवड केल्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने करावी याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:Vegetable Farming: हिवाळ्यात या भाज्यांची लागवड करा आणि बंपर उत्पन्न कमवा; आरोग्यासही आहेत लाभदायक

 कांद्याचे अन्नद्रव्य व्यवस्थापन देईल भरघोस उत्पादनाची हमी

1- कांद्याची पुनर्लागवड नंतर दोन महिन्यांपर्यंत नत्राची गरज जास्त प्रमाणात लागते. परंतु कांद्याची जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा नत्राची गरज नसते.

3- कांद्याच्या मुळाची भरघोस वाढ व्हावी याकरिता स्फुरद आवश्यक असते. त्यामुळे स्फुरद जमिनीत तीन ते चार इंच खोलीवर रोपांच्या लागवडी अगोदर द्यावे म्हणजे नवीन मूळ तयार होईपर्यंत स्फुरद उपलब्ध होते.

3- तसेच पालाश झाडांच्या पेशींमध्ये जे काही मूलद्रव्ये असतात त्यांच्या ने आण करण्यासाठी आवश्यक असते. पालाशमुळे वनस्पती पेशींना काटकपणा येतो व विविध रोगांविषयी लढण्याची शक्ती वाढते. पालाश आणि स्फुरदची पूर्ण मात्रा लागवडीअगोदर देणे गरजेचे आहे.

4- तसेच गंधकाची देखील कांदा पिकाचे भरघोस वाढीसाठी गरज आहे. गंधकाचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे गंधकाचा वापर यामुळे कांद्याची साठवणूक क्षमता वाढते. 

शेतकरी बंधुंनी सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश आणि अमोनिअम सल्फेट किंवा युरिया यांच्याद्वारे खते दिली तर गंधक वेगळा वापरण्याची गरज भासत नाही.

नक्की वाचा:Wheat Farming: गव्हाच्या या देशी वाणाची योग्य वेळी पेरणी केली तर कराल मोठी कमाई; पावसातही राहते सुरक्षित

त्यासोबतच पाण्यात विरघळणारे गंधक पावडर दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी व्यवस्थित कर सोबत मिसळून फवारणी केली तरी पिकाला खूप चांगला फायदा मिळतो.

5- 60 किलो नत्र,20 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश आणि त्यासोबत 20 किलो ग्रॅम गंधकयुक्त खते देणे गरजेचे असून या रासायनिक खतांपैकी 1/3 भाग नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश गंधक लागवडीच्या वेळी आणि राहिलेले नत्र दोन हप्त्यात विभागून देणे गरजेचे आहे. नत्राचे नियोजन करताना लागवडीनंतर 30 दिवसांनी पहिला हप्ता आणि पहिल्या हप्त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी दुसरा हप्ता द्यावा.

परंतु कांदा पिकास नत्र युक्त खते शिफारशीपेक्षा जास्त दिले तर किंवा लागवडीनंतर 60 दिवसांनंतर दिले तर जोड कांद्याचे प्रमाण तसेच कांदे डेंगळे होण्याचे प्रमाण वाढते. तसेच कांद्यांच्या साठवण क्षमतेवर देखील विपरीत परिणाम होतो.

6-  कांद्याची पुनर्लागवड झाल्यानंतर दोन महिने झाले कि तीन ग्रॅम 00:52:34 प्रति लिटर पाण्यात घेउन फवारणी करावी तसेच आवश्यकता असेल तर दोन ते तीन ग्रॅम 00:00:50 प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

नक्की वाचा:Rabbi Season Crops: रब्बी हंगामासाठी ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

English Summary: this is onion fertilizer management is so important after onion crop recultivation Published on: 16 October 2022, 03:50 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters