काळीमिरी ही मसाला वर्गातील पिक असून खूप महत्त्वपूर्ण पीक आहे. जर आपण काळीमिरीचा विचार केला तर लागवड केल्यानंतर तीन वर्षानंतर काळी मिरीचे उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. काळीमिरीला आगोदर तुरे येतात व हे तुरे साधारणतः मे व जून महिन्यामध्ये येतात. त्यानंतर नऊ महिन्यानंतर म्हणजे जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घोस काढण्यासाठी तयार होतात.
म्हणजेच या स्टेजपर्यंत जेव्हा पीक येते तेव्हाच मिरची काढणी करता येते. मिरची काढणी करताना काही महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. त्यासंबंधीची व्यवस्थेत आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.
मिरीची काढणी करण्याची प्रक्रिया
1- यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मिरची काढणी करण्यासाठी जे काही झाडाला घोस लागलेले असतात. त्यामधील एक ते दोन दाणे पिवळे अगर नारंगी रंगाचे झाले तेव्हाच मिरी वरील सर्व घोस काढले जातात. यावेळी घोसा मधील दाण्यांचे खूप काटेकोरपणे व काळजीपूर्वक निरीक्षण केले जाते. बऱ्याचदा यामध्ये गल्लत उडते ती अशी की कोकीळ सारखे पक्षी पिकलेल्या मिरीची दाणे बऱ्याचदा खातात व त्यामुळे दाण्याचा रंग बदलतो. हे दाणे चटकन लक्षात येत नाहीत.
2- मिरीच्या काढणी हंगामा शक्यतो हिवाळ्या ऋतूत येत असल्यामुळे या कालावधीत भरपूर दव पडलेले असते. त्यामुळे मिरीचे दाणे सुकवितांना ते दवात भिजणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते.
जर मिरीचे दाणे दवात ओले झाल्यामुळे ते पांढरट होतात व अशा मिरीला बाजारपेठेत किंमत मिळत नाही.
3- महत्वाचे म्हणजे जेव्हा मिरीचे घोस झाडावरून काढले जातात त्यानंतर घोसा मधील दाने अलग करून काढावे लागतात. घोस काढल्यानंतर ताबडतोब मिरीचे दाणे वेगळे करता येणे खूप कठीण काम आहे. कारण मिरीच्या घोसाच्या आतल्या भागात हे दाणे घट्ट चिकटलेले असतात.
त्यामुळे मिरीची काढणी दुपारनंतर करणे गरजेचे असते. रात्री घोस तसेच ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्या घोसातले दाने वेगळे केले जातात. नंतर त्यांना उन्हात सुकवले जाते व सात ते दहा दिवस उन्हात वाळवावे लागतात.
4- आता मिरी तयार करण्यासाठीची एक सुधारित पद्धत विकसित करण्यात आली असून त्या माध्यमातून मिरी दाणे वाळवण्यापूर्वी उकळत्या पाण्यामध्ये एक मिनिट बुडवून काढले जातात. या पद्धतीमुळे हे मिरीचे दाणे दोन ते तीन दिवसातच चांगले वाळतात व आकर्षक काळा रंग येतो.
दुसऱ्या महत्त्वाचा फायदा म्हणजे साठवण करताना बुरशीमुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. एकावेली पासून सरासरी पाच किलो हिरव्या मिरीचे उत्पादन मिळते व त्यापासून दीड किलो सुकलेली मिरी मिळते.
नक्की वाचा:कपासीमध्ये कमी फुले आणि फुलगळीच्या समस्या असतील तर हे करा उपाय
Share your comments