1. कृषीपीडिया

Seed Processing: शेतकरी बंधूंनो!'अशा' प्रकारे करा जिवाणू खतांची बीजप्रक्रिया, होईल फायदा आणि मिळेल अधिक उत्पादन

बियाणे लागवड करण्याआधी बियाण्यांना बीजप्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे. बीज प्रक्रिया केल्यामुळे सशक्त आणि निरोगी रोपे तसेच कीड आणि रोगमुक्त रोपांची निर्मिती होते. बियाण्याची निवड केल्यानंतर त्या बियाण्यावर बीजप्रक्रिया करणे तितकेच महत्त्वाचे असते. कारण लागवडीनंतर बहुतांशी रोग हे बिजापासून उद्भवतात आणि पसरतात. त्यामुळे बुरशी तसेच इतर नुकसानकारक कीटकांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. या लेखात आपण जिवाणू खताची बीजप्रक्रिया कशा पद्धतीने करावी? याबद्दल महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
seed processing for crop

नक्की वाचा:Crop veriety: हवे असेल मुगापासून बंपर उत्पादन तर 'या' दोन जाती ठरतील शेतकऱ्यांसाठी वरदान, मिळेल बंपर उत्पादन आणि नफा

 जिवाणू खताची बीजप्रक्रिया करण्याच्या पद्धती

 या पद्धतीमध्ये अनेक उपयुक्त जिवाणू खतांचा वापर करून जमिनीतील पोषक घटकांच्या उपलब्धतेमध्ये वाढ करण्यास मदत होते. यामध्ये काही जिवाणू खते वापरले जातात त्यातील पहिला म्हणजे…..

1- रायझोबियम जिवाणू- हे जिवाणू द्विदल पिकांच्या मुळांवरील गाठीत राहून सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. हे जिवाणू झाडातील अन्न रस मिळवतात व त्या बदल्यात झाडांना नत्राचा पुरवठा करतात. हे जिवाणू साधारणपणे 100 ते 200 किलोग्रॅम प्रति हेक्टर नत्र स्थिर करू शकतात.

2- ऍझोटोबॅक्टर जिवाणू- हे जिवाणू एकदलीय पिकांच्या मुळावर राहून अन्न मिळवतात व 20 ते 30 किलोग्रॅम प्रति हेक्टर नत्र स्थिर करतात.

3- पीएसबी जिवाणू- हे जिवाणू मातीमधील न विरघळणाऱ्या, तसेच उपलब्ध न होणाऱ्या फॉस्फरसचे विघटन करून ते पिकासाठी मिळवून देतात. यासाठी 250 ग्रॅम पाकीट प्रति दहा किलो बियाण्यासाठी जिवाणू संवर्धकासाठी वापरावे.

नक्की वाचा:कांदा बिजोत्पादन बाबत महत्वाचा लेख

जिवाणू खतांची बीजप्रक्रिया अशा पद्धतीने करावी

 जिवाणू खतांच्या प्रक्रियेचा फायदा व्हावा यासाठी योग्य पद्धतीने बीजप्रक्रिया करणे फायद्याचे ठरते. हे 250 ग्रॅम जिवाणू खत 10% गुळाच्या द्रावणात मिसळून प्रति दहा किलो बियाण्यास प्रक्रिया करून सावलीत सुकवून घ्यावे आणि 24 तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे ( दहा टक्के गुळाचे द्रावण म्हणजे एक लिटर पाण्यात 100 ग्रॅम गूळ विरघळून तयार होणारे द्रावण होय)

अशा पद्धतीने कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रिया पद्धतीचा वापर तुम्ही करू शकतात. यामुळे रोग नियंत्रणासाठी येणारा जो काही खर्च असतो तो कमी होतो व उत्पादन खर्चात बचत होते.

नक्की वाचा:Cotton Management: शेतकरी बंधूंनो! कपाशीवरील तुडतुडे ही कीड असते नुकसानकारक, अशा पद्धतीने करा एकात्मिक व्यवस्थापन

English Summary: seed processing of crop is so nessesary for prevention to crop from harmful insect Published on: 01 November 2022, 05:21 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters