1. कृषीपीडिया

स्टीन्क ढेकुणामुळे कापसातील बोंडसड त्यावर असा आहे सोप्पा उपाय

कापूस पीकावार पूर्वी दुय्यम समजल्या जाणा-या स्टीन्क

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
स्टीन्क ढेकुणामुळे कापसातील बोंडसड त्यावर असा आहे सोप्पा उपाय

स्टीन्क ढेकुणामुळे कापसातील बोंडसड त्यावर असा आहे सोप्पा उपाय

कापूस पीकावार पूर्वी दुय्यम समजल्या जाणा-या स्टीन्क ढेकूनाच्या प्रादुर्भावामुळे कापसाची बोंडे सडत आहे प्रादुर्भावामुळे डाग पडून रुई काळी होणे व बोंडे सडतआहेत रस शोषणास उपयुक्त मुखरचना असणाऱ्या स्टीन्क ढेकुण आणि झाडांवर आढळणारी ढेकुण यांचा अमेरिकन कापसात प्रादुर्भाव वाढण्याचे महत्वाचे कारण म्हणजे बीटी कापसाच्या आगमनानंतर बोंडअळ्यांचे व्यवस्थापन होत

असल्यामुळे रासायनिक किटकनाशकाचा वापर तुलनेने कमी झाल्यामुळे स्टीन्क ढेकुणसारख्या किरकोळ किडींचा प्रादुर्भाव तुरळक भागात होत आहे.Insect infestation is occurring in sporadic areas त्याचप्रमाणे बोंडावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींचा उद्रेक वाढण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे सोयाबीन पीकाचे वाढलेले क्षेत्र होय. सोयाबीन हे स्टीन्क ढेकुण या किडीसाठी योग्य अश्रित पीक आहे.

या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे म्हणजे प्रथमत: स्टीन्क भुंग्याचा ढेकुण कोवळ्या बोंडावर छिद्र पाडून आतील कोवळ्या सरकीतील रस शोषण करतो. त्याठिकाणी बोंडाच्या बाहेरील भागात काळे ठिपके दिसतात.बोंडाच्या सालीवर आतील बाजूस चामखीळसारखी अतिरिक्त वाढ दिसून येते. अगदी याचखाली रुईवर सुरुवातील पिवळसर चट्टा दिसून येतो. त्याचे रुपांतर पुढे चालून रुई व सरकी तपकीरी

– काळसर होण्यात होते. त्यामूळे रुईवर डाग पडतात व धाग्यांचा गुंता होतो. ढेकुण कोवळ्या सरकीतील रस शोषण केल्यामुळे सरकी सुरकुटलेली बनते.याचबरोबर प्रादुर्भावग्रस्त बोंडामध्ये जीवाणू व बुरशींचा शिरकाव होतो व त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त बोंडे सडतात. मोठ्या आकाराची बोंडे सडत असतांना त्यामध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे अपरिपक्व सरकीची उगवण होत असल्याचे दिसून आले आहे.

या सर्वांचा दुष्परिणाम रुईच्या प्रतीवर होतो.शेतक-यांनी पीकाच्या काठाने बांधाच्या शेजारी या किडीचा प्रादुर्भाव असल्याची खात्री करावी. स्टीन्क भुंगा ही कीड देशामध्ये यापूर्वी नुकसानकारक नसल्यामुळे देशातील कृषि संशोधन संस्थांनी संरक्षणाचे उपायांची शिफारस केली नाही. तथापि अमेरिकेतील कॅलीफोर्निया कृषि विद्यापीठाने केलेल्या

शिफारशीनुसार या किडीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकतेनुसार पुढीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाचा वापर करावा. याकरिता असिफेट ७५ एसपी २० ग्राम किंवा क्लोरोपायरीफोस २० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात साध्या पंपाद्वारे फवारणीसाठी द्रावण वापरावे. पावर स्प्रेअरसाठी किटकनाशकाचे प्रमाण तीनपट वापरावे.

 

शिंदे सर

भगवती सीड्स, चोपडा

9822308252

English Summary: This is a simple solution for cotton binding due to stink lumps Published on: 24 August 2022, 09:00 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters