1. कृषीपीडिया

खतरनाक आहे वांग्यातील शेंडा व फळे पोखरणारी अळी, एकात्मिक व्यवस्थापनाने करा वांग्याची सुरक्षा!

वांगी या भाजीपाला पिकांमध्ये शेंडा व फळे पोखरणारी आळी जवळजवळ 40 टक्यांपण पर्यंत नुकसान करते. जर या किडीचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर होणारे नुकसान 80 टक्यां ह पर्यंत देखील जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणे फार गरजेचे असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
brinjaal crop management

brinjaal crop management

वांगी या भाजीपाला पिकांमध्ये शेंडा व फळे पोखरणारी आळी जवळजवळ 40 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान करते. जर या किडीचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर होणारे नुकसान 80 टक्‍क्‍यांपर्यंत देखील जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणे फार गरजेचे असते.

या लेखामध्ये आपण या किडी विषयी आणि तिचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.

 वांग्यातील फळे व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नुकसानीचा प्रकार

 या किडीच्या प्रादुर्भाव हा वांग्याचे रोप लावल्यानंतर काही आठवड्यानंतर दिसून येतो. ही अळी प्रथम पानाच्या देठात,कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. या किडीच्या प्रादुर्भावाचे प्रमुख लक्षण म्हणजे प्रादुर्भावग्रस्त शेंडे वाळतात. वांग्याचे पीक फुलोरा अवस्थेत आल्यानंतर ही कीड कळी  पोखरून आत शिरते.प्रादुर्भावग्रस्त फुले फळन धरता वाळून व सुकून जमिनीवर गळून पडतात. फळे आल्यानंतर ही अळीसुरुवातीला छिद्रकरून फळांमध्ये प्रवेश करून विष्टेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडल्याचे लवकर लक्षात येत नाही.

 या अळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

  • उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून या किडीच्या च्या विविध व्यवस्था तापमानामुळे नष्ट होतात.
  • एकाच प्रकारच्या शेतामध्ये वर्षानुवर्ष वांग्याचे पीक घेऊ नये. जास्त प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पुढच्या वर्षी वांग्याचे पीक घेणे टाळावे. पिकांची योग्य प्रमाणात फेरपालट करावी.
  • मागील वांगी पिकाचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
  • लागवडीसाठी वांग्याच्या सुधारित व शिफारशीत जातींचा वापर करावा. या पिकाला गरजेनुसारच खतमात्रा द्यावी व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
  • प्रादुर्भाव झालेल्या झाडाचे शेंडे व फळे तोडून अळ्यासहित त्याचा नायनाट करावा.
  • वानांच्या शिफारसीनुसार दोन झाडांमधील व दोन ओळींमधील अंतर ठेवणे आवश्यक आहे.
  • प्रकाश सापळ्यांचा उपयोग करून पतंग नष्ट करावेत.
  • पिकामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावणे गरजेचे आहे. शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळ्यांच्या तीव्रतेची कल्पना येईल.
  • पाच टक्के निंबोळी अर्काची किंवाअझाडेरेक्टिनदहा हजार पीपीएम अडीच मिली प्रती लिटर पाणी याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
  • जैविक कीड नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा व ब्रेकॉनया परोपजीवी कीटकांच्या अंड्यांचे प्रसारण करावे.
English Summary: this insect is very dengerous and harmful for brinjaal crop so integrated management is important Published on: 04 March 2022, 04:51 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters