1. कृषीपीडिया

हि शेती म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न हा शेतकरी घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न

नियोजन करून जर शेती केली तर शेतीमध्येही लाखोंचे उत्पन्न काढू शकतो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
हि शेती म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न हा शेतकरी घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न

हि शेती म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न हा शेतकरी घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न

नियोजन करून जर शेती केली तर शेतीमध्येही लाखोंचे उत्पन्न काढू शकतो. लखीमपूर खीरी मध्ये बांबूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने 7 वर्षात 4 पटीपेक्षा जास्त पैसे कमवण्याचा मार्ग शेतीत शोधला आहे. खीरी जिल्ह्याचा हा सुशिक्षित शेतकरी आहे .जो पारंपारिक शेतीतून बांबू (traditional farming) लागवड (Planting) करत आहे. फक्त बांबूची लागवड करत नाही तर दोन वर्षात या शेतीत सह-पीक (crop) म्हणून उसाची लागवड (Planting) करून चांगला नफा कमवत असल्याचे माहिती समोर आलेली आहे. लागवडीबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

 

बांबू पिका बद्दल काही महत्वाची माहिती -

पावसाळ्याच्या सुरवातीस चांगली माती, शिफारशीत कीडनाशक भुकटी, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटही मातीमध्ये मिसळावे. अशा भरून घेतलेल्या खड्ड्यांमध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत वाढलेली रोपे किंवा गादीवाफ्यावर वाढविलेली रोपे रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत. बांबूस पाणथळ जमीन चालत नाही, त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.

बांबू रोपांची पावसाळ्यात लागवड झाल्यानंतर पहिल्या वर्षी डिसेंबर ते मे महिन्यात लागवडीस पाणी द्यावे. निंदणी व भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे. मोकाट जनावरे, वन्यप्राणी आणि आगीपासून संरक्षण करावे. 

 

बांबूची लागवड जर रोपांपासून केली, तर सहा ते आठ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते. कोंबातून बाहेर पडणारा बांबू पूर्णपणे वाढून बेटातील अगोदरच्या बांबूच्या आकाराएवढा झाला असेल, तर जुना बांबू जमिनीपासून 30 सें.मी. उंचीवर कापावा. पहिल्या कापणीपासून प्रत्येकी दोन वर्षांच्या कालावधीने पुढील बांबूच्या कापण्या कराव्यात. एक वर्षाचा कोवळा बांबू कापू नये. जितके नवीन कोंब आले असतील, तितकेच जुने बांबू तोडावेत. पक्व बांबू ठेवून नवीन बांबू तोडू नयेत. 

दर वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस प्रत्येक रोप/ कंदाला 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 25 ग्रॅम युरिया याप्रमाणे खते द्यावीत. त्यानंतर दोन महिन्यांनी हीच मात्रा पुन्हा द्यावी. बांबू खतांना चांगला प्रतिसाद देतात, असे आढळून आलेले आहे. कंदांपासून लागवड केल्यास चार ते पाच वर्षांपासून उत्पादनास सुरवात होते.

बांबू सोबत इतर पीक 

वयाच्या 65 व्या वर्षीही शेतीमध्ये नवे प्रयोग करण्याची सुरेशची आवड कमी झालेली नाही. पारंपारिक ऊस, भात आणि गव्हाच्या लागवडीपेक्षा (Planting) काहीतरी वेगळे करण्याच्या त्याच्या इच्छेने त्यांना बागायतीचे मास्टर बनवले आहे.आंबा, आवळा, लिची आणि लिंबू लागवड करण्याबरोबरच, अंतर्गत शेती आणि सह-पीक देखील करतात. उसाबरोबरच त्यांनी बांबू (Bamboo) लागवडीचा (Planting)नवा प्रयोग सुरू केला आहे. आता त्याच्या शेतात बांबू वाढत आहे.

 

ही पिकेही केली जाणार –

दीड एकर शेतजमिनीमध्ये बांबूची लागवड (Bamboo cultivation) सुरू केली. यासह, तीन वर्षे सह-पीक म्हणून, बांबू लागवडीबरोबरच (Bamboo cultivation) ऊसाची लागवडही चालू ठेवली. पण चौथ्या वर्षापासून शेतात फक्त बांबू शिल्लक राहिले. आंतरपीक घेण्याच्या इतर विचारही करत आहे. बांबू उगवल्यानंतर हळद, आल्याचीही लागवड (Planting) आज करता येते.

बांबू शेतीचे व्यवस्थापन व उत्पन्न –

जर तुमच्याकडे जास्त शेती (Agriculture) असेल, तर बांबू लागवड (Planting) ही तुम्हाला चांगला फायदा करून देण्यासाठी हमी योजना आहे. वर्माने सांगितले की त्याने पंतनगर कृषी विद्यापीठातून (University of Agriculture) 25 रुपये किमतीचे रोपटे आणून एका एकरात 234 रोपे लावली. त्यांनी सांगितले की एका झाडामध्ये चार वर्षात वीस ते 22 बांबू तयार केले आहेत. एका बांबूच्या रोपामध्ये 40 ते 50 बांबू असतील अशी अपेक्षा आहे. सुरेशचंद्र शर्मा यांनी सांगितले की, गावातच बांबू 150 रुपयांना विकला जातो. अशा प्रकारे, जर 234 वनस्पतींमध्ये 50-50 बांबू बाहेर पडले तर 11700 बांबू असतील. जर 150 रुपये प्रति बांबू दर मिळाला तर ते 17.55 लाख होते.

English Summary: This farming is a low cost and more production this farmer take millions Published on: 10 March 2022, 03:35 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters