1. कृषीपीडिया

या शेतकऱ्याने सोयाबीन कुटारा पासुन असे बनवले उत्तम खत, कसे बनविले ते पाहाच

विदर्भ तसेच मराठवाड्यात जास्त प्रमाणात सोयाबीन ची लागवड केल्या जाते परंतु शेतकरी सोयाबीन चे कुटार एकतर विक्री करतात

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
या शेतकऱ्याने सोयाबीन कुटारा पासुन असे बनवले उत्तम खत

या शेतकऱ्याने सोयाबीन कुटारा पासुन असे बनवले उत्तम खत

विदर्भ तसेच मराठवाड्यात जास्त प्रमाणात सोयाबीन ची लागवड केल्या जाते परंतु शेतकरी सोयाबीन चे कुटार एकतर विक्री करतात किंवा जाळुन टाकतात परंतु असे न करता सोयाबीन थ्रेशरीग झाल्यानंतर निघालेल्या कुटाराचा धुरयावर ढिग मारुन उत्तम प्रकारे खत करता येते यामुळे जमीनीचा कर्ब वाढण्यास मदत होते.

      परंतु सोयाबीन कुटारा तसेच शेतात फेकुन दिल्यास बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.तसेच सोयाबीन पिकावर चक्री भुंगा,खोड किड,काँलर राँट असे किडींचा व रोगाचा प्रादुर्भाव होतो.त्यामुळे सोयाबीन कुटार तसेच फेकुन देऊ नये.सोयाबीन कुटाराचे खत तयार करण्याची सोपी पध्दत

सोयाबीन थ्रेशरीग झाल्यानंतर कुटार हे धुरयावर ढिग मारुन पाईप च्या सहाय्याने ओले करुन घ्यावे व त्यावर

वेस्टडिकंपोजर

ट्रायकोडर्मा

रायझोबियम

पि.एस.बी

कुटारावर टाकुन प्रक्रिया केल्यास लवकर कुटार कुजते व हि क्रिया दोन वेळेस करावी जेणे करुन कुटारात जिवानुची संख्या वाढेल.परंतु हे करत असताना कुटार नेहमी ओले करावे लागते.कुटारावर मायक्रो स्पिकंलर लावुन ठेवल्यास उत्तमच. मित्रांनो रासायनिक खतांचा बेसुमार वापर थांबवुन सेंद्रिय खताचा वापर वाढवील्या शिवाय पर्याय नाही.

जमिनीची उत्पादकता वाढवायची असेल तर सेंद्रिय कर्ब आणि जिवाणू वाढ केल्याशिवाय आपल्या जवळ दुसरा कोणताच पर्याय नाही.त्यामुळे आपले कोणतेही पिक प्रतिकार क्षम होईल व रोग कमी पडतील.

आपण रासायनिक खताचा कितीही वापर केला तर ती खते जशीच्या तशी पिक ग्रहण करीत नाही.

तर त्या खतावर प्रक्रिया करुन पिकाना उपलब्ध करुन देण्यासाठी जमिनीत मोठ्या प्रमाणात जिवाणू असले पाहीजे तरच जमिनीची उत्पादकता वाढेल.  रासायनिक खते हे जिवाणू चे खाद्य नाही.जिवाणूंचे खाद्य आहे जमिनीतील सेंद्रिय कर्ब जमिनीत आपण जमीनीत टाकलेल्या खतांवर हे जिवाणू जैविक भौतिक रासायनिक क्रिया घडवून आणतात व ते पिकाला ग्रहण करण्या योग्य करण्याचे काम करतात.आपल्या जमिनीत असे काम हे जिवाणू अहोरात्र करीत असतात ज्या जमिनीत जिवाणू जास्त असते अशा जमिनीचा सेंद्रिय कर्ब ही जास्त असतो.

रासायनिक खतांचा अतिवापर करुन आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब खूप कमी करुन टाकलेला आहे.म्हणुन दिवसेंदिवस आपले उत्पन्न कमी होत आहे.

 म्हणुन आपण जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे,जमिनीचे आरोग्य सुधारल्या शिवाय,जमीन आपल्याला जास्त प्रमाणात उत्पन्न देऊ

शकणार नाही.जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खताचा वापर कमी करुन सेंद्रिय व जैविक खताचा वापर वाढवला पाहिजे.त्यासाठी शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत,पाझर तलावाचा गाळ,हिरवळीचे खत,काडी कचरा जमिनीत गाडुन,सोयाबीन कुटार,गव्हाचे कुटार,गव्हाचे काड जमिनीत गाडुन इत्यादी चा वापर वाढवावा लागेल.

जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जेव्हढे जास्त तेव्हढे ते पिक उत्पादन आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्माचा सवंर्धनाच्या द्रुष्टीने चांगले असते.सेंद्रिय कर्बची टक्केवारी शोधल्यास जमिनीतील एकुणच नत्राच्या प्रमाणाचाही अंदाज लागतो

माझ्या शेतात मि सोयाबीन कुटार कुजवुन नागरटी करायच्या अगोदर टाकुन त्यावर नांगरटी केली आहे कुटाराचे फोटो सुद्धा पाठवित आहे

 

शेतकरी मित्र

विजय भुतेकर सवणा

9689331988

English Summary: This farmer made the best fertilizer from soybean kutara Published on: 04 April 2022, 10:17 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters