1. कृषीपीडिया

शेती फायद्यात नसण्याची ही आहेत करणे

तोट्याची शेती ह्या गोष्टीचा विचार केला असता डोळ्यासमोर ३ कारणे उभी राहतात

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेती फायद्यात नसण्याची ही आहेत करणे

शेती फायद्यात नसण्याची ही आहेत करणे

तोट्याची शेती ह्या गोष्टीचा विचार केला असता डोळ्यासमोर ३ कारणे उभी राहतात जर त्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून निर्णय घेतले तर आपण आपली शेतीला नक्कीच उन्नतीच्या,प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकू, तर जाणून घ्या कारणे आत्मविश्वास कमी असणे आत्मविश्वास कमी असणे म्हणजे काय ? मित्रांनो माश्याच्या पिल्लाला पाण्यात पोहायला कधी शिकवले जाते का? ती कला त्यांच्यात उपजतच असते त्याच प्रमाणे आपण शेतकऱ्यांची पोर शेती व्यवसाय पूर्वापार चालत आलेला, आपल्या पंजोबानी, आजोबांनी, वडिलांनी, शेती केली त्यानंतर ती परंपरा आपल्याकडे सुपूर्त करण्यात आली जितकी शेती आपण रोज बघतो, त्यातील अडचणी नित्याच्या आहेत ते प्रतिदिवशी बघत असतो

तितक्या कोणीच बघत नाही, तरीही आपण ज्या सल्लागारांनी, कंपनी प्रतिनिधीने, शेतीत कधीही पाऊल दिलेले नाही त्या लोकाकडून शेती शिकतो आणि त्यांच्या म्हणण्यानुसार शेती करतो ह्याचा अर्थ असा निघतो सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात पण उमजत नाही आणि उमजत असल्या तरीही त्या अंमलात आणण्यासाठी दुसर्याच्या सल्ल्याची गरज लागते म्हणजे आपल्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे.आता हेच बघा न पाऊस पडतोय त्या वातावरणात स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी करावी लागते हे माहीत असल्यावर सुध्दा आपन दहा जणांना विचारत फिरतो की आता कोणती फवारणी करावी लागेल.भिती - भिती हा शेती करताना सगळ्यात महत्वाचा विषय आहे आपण दैनदिन कामे करत असताना आपला आत्मविश्वास कमी असल्याने आपल्या आजूबाजूला एक विशिष्ट वर्ग वावरत असतो तो आपल्या मनात अजून भीती जागृत करतो 

आणि मग तिथून नवनवीन प्रॉडक्ट आणि त्याच्या विक्रीची शृंखला सुरू होते, आजार एक आणि त्यावर उपचारात्मक उत्पादने हजारो त्यात आपली भीती ह्या सर्वांची सांगड बसली की कोणते उत्पादन वापरावे ह्यात आपण गुरफटून जातो आणि आपल्याला त्या आजारावरचे योग्य निदान माहिती असूनही आपण निर्णय घ्यायला असमर्थ ठरतो आणि आपला निर्णय दुसऱ्याचा सल्ल्यात शोधत बसतो आणि तिथून आपल्या खर्चाचे गणित चुकायला सुरुवात होते. भीतीपोटी चुकीचे निर्णय घेत असतो, किंवा चुकीचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीच्या आहारी जाऊन वायफळ, अनावश्यक खर्च वाढवून घेतो उदा:- पाऊस पडतोय तरीही फवरलेली पावडर पानावरून वघळून जाईल किंवा अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत हे ठाऊक असूनही भीतीपोटी वारवार फवारे घेऊन पैशाचा अपव्यय करणे किंवा सकाळी फवारा झाला परंतु सायंकाळी पाऊस पडला तर लगेच पाठोपाठ दुसरा फवारा देणे हेही भीतीपोटी खर्चिक काम करतो.

अपुरे ज्ञान आपण २१ व्या शतकात वावरत आहोत सद्या टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, तंत्रज्ञान आपल्या हातात आहे,१ क्लिक केले की हवी ती माहिती आपल्याला ठेवल्या ठिकाणी उपलब्ध होत असते त्या योग्य तंत्रज्ञानाचा आपण फायदा घेतला पाहिजे, एखादा प्रतिनिधी औषध सुचवतो तर त्याची कार्यपद्धती, ते कोणत्या पिकावर रजिस्टर आहे, कोणत्या रोगावर/किडीवर चालते, कोणत्या वातावरणात कोणती औषधे वापरावीत ही सगळी माहिती उपलब्ध होत असते तरीही आपण काखेत कळसा गावाला वळसा ह्या म्हणीप्रमाणे इतरत्र शोध घेत असतो.तरीही योग्य पद्धतीने शेती करण्याचे काही मूलमंत्र आहे ते कायमस्वरूपी आपल्या दिमाखात ठेवा आपला निर्णय आपण घ्या.शेतीत लावलेले पीक मुळा पासून ते शेंड्या पर्यंत समजून घ्या कोणत्या स्टेजला कोणता आजार कोणती कीड उद्भवते त्याला कंट्रोल करणारी औषधे कोणती त्याचे प्रमाण त्याची फवरण्याची वेळ त्याची कार्यपद्धती समजून घ्या ते वापरल्यानंतर त्याचे मिळणारे रिझल्ट नोंद करून

English Summary: These are the things that do not benefit agriculture Published on: 10 June 2022, 07:39 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters