1. कृषीपीडिया

तुम्हीही आहात का शेतकरी? मग जाणुन घ्या वांग्याचे पिक घेण्याआधी वांग्याच्या जातीविषयी.

वांग्याच्या अनेक संकरीत जातीचा शोध देशातील प्रगत कृषी संस्थानांनी लावलेला आहे. कुठलेही पिकाचे चांगले उत्पादन येण्यासाठी त्याची वाण महत्वाची भूमिका निभावते, आणि तेव्हाच त्या पिकातून बळीराजाला चांगले उत्पादन व परिणामी नफा मिळतो म्हणुनच आज आपण जाणुन घेणार आहोत वांग्याच्या विविध जातींविषयी.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
brinjaal

brinjaal

वांग्याच्या अनेक संकरीत जातीचा शोध देशातील प्रगत कृषी संस्थानांनी लावलेला आहे. कुठलेही पिकाचे चांगले उत्पादन येण्यासाठी त्याची वाण महत्वाची भूमिका निभावते, आणि तेव्हाच त्या पिकातून बळीराजाला चांगले उत्पादन व परिणामी नफा मिळतो म्हणुनच आज आपण जाणुन घेणार आहोत वांग्याच्या विविध जातींविषयी.

वांगी हे एक प्रमुख भाजीपाला पीक आहे, ज्याची लागवड आपल्या देशातील जवळजवळ सर्व राज्यांमध्ये केली जाते. वांगीच्या अनेक सुधारित प्रजाती विविध कृषी विद्यापीठे आणि फळबागांमध्ये गुंतलेल्या संस्थांनी विकसित केल्या आहेत. शेतकऱ्यांनी पीक लागवड करण्यापूर्वी वाणांकडे लक्ष दिले पाहिजे, तरच चांगले पीक येईल आणि चांगली कमाईही होईल. कृषी वैज्ञानिक नेहमी वांग्याच्या खाली दिलेल्या जातींची शिफारस करतात.

 

 

 

 

पुसा पर्पल लॉन्ग:

ही प्रजाती IARI, नवी दिल्ली यांनी विकसित केली आहे. ही प्रजाती बोरर कीटकांच्या विरुद्ध सहनशील आहे. यात लहान पानाच्या रोगही कमी प्रमाणात अटॅक करतो. गुळगुळीत चमकदार हलका जांभळा रंग असलेली फळे सुमारे 25 ते 30 सें.मी. लांब असतात. हे सरासरी 27.5 टन/हेक्टर उत्पादन देते.

 

 

 

 

पुसा क्रांती:

 ही वाण देखील आयएआरआय, नवी दिल्लीने विकसित केली आहे, या जातीची वांगी ही  आयताकृती आणि गडद जांभळ्या रंगाची असतात व वांग्याचे रोपटे हे उंचीला कमी असते. सरासरी उत्पादन 15-16 टन/हेक्टर आहे आणि फळ 130 ते 150 दिवसात काढण्यायोग्य होते.

 

 

 

 

पुसा पर्पल क्लस्टर:

 हे IARI, नवी दिल्ली यांनी विकसित केले आहे. या वाणीची फळे लहान आणि गडद जांभळ्या रंगाची असतात, जी लावणीनंतर 75 दिवसात काढणीसाठी तयार होतात. याला लहान पानांच्या रोग लागत नाही.

 

 

 

 

 

पुसा पावसाळी:

 ही जात पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना यांनी विकसित केली आहे,  ही एक बुटकी जात आहे ज्यात वांग्याला काटे नसतात, वांगे जांभळ्या रंगाची असतात, सरासरी उत्पादन 35. 0 टन/हेक्टर असते.

 

 

 

 

 

 

 

हरिता:

जास्त उत्पादनासाठी ह्या वाणांची लागवड करणे फायदेशीर असते. हे केरळ कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे, जीवाणूजन्य विल्ट रोगाला प्रतिकारक आहे आणि जास्त उत्पन्न देते. हे सरासरी 62 टन/हेक्टर उत्पादन देते आणि वांग्याला हलका हिरवा रंग असतो आणि आकाराने ही वांगी मोठी असतात.

 

 

 

 

 

अर्का नवनीत

हे आयआयएचआर, बेंगलोर यांनी विकसित केले आहे. फळे अंडाकृती आणि आयताकृती, गडद जांभळ्या रंगाची असतात आणि ह्या जातीच्या वांगीला उत्कृष्ट चव असते. याची कापणी 150 - 160 दिवसात करता येते आणि सरासरी उत्पादन 65 - 70 टन/हेक्टर असते.

 

 

 

 

 

 

अर्का केशवी:

 हे आयआयएचआर, बेंगळुरू येथे विकसित केले गेले आहे. ह्या जातीची विल्ट बॅक्टेरियाच्या विरुध्द रोग प्रतिकार क्षमता अधिक असते. जे सरासरी 45 टन/हेक्टर उत्पादन देतात, वांगी 150 दिवसांच्या आत काढता येतात.

English Summary: the veriety of brinjaal crop Published on: 03 September 2021, 11:00 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters