1. कृषीपीडिया

महत्वाचे! केव्हीके घातखेड चे श्री. राजेश राठोड सर यांचे शेतीमध्ये तंत्रज्ञानाची सांगड याबद्दल बहुमोल मार्गदर्शन

नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती हा व्यवसाय म्हणून उत्तम पद्धतीने व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जर आपन आत्मसात केली तर आपला वेळ व पैसा दोन्ही वाचलं!

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
use of technology in fsrming is so criucial

use of technology in fsrming is so criucial

नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती हा व्यवसाय म्हणून उत्तम पद्धतीने व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जर आपन आत्मसात केली तर आपला वेळ व पैसा दोन्ही वाचलं!

हाच विषय शेतकर्या पर्यंत पोहचवण्यासाठी के व्ही के घातखेड यांच्या माध्यमातून शेती मधे नवीन स्वयमचलित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपन कसे अवगत करावे हा मुद्दा श्री राजेश राठोड सर यांनी शेतकर्याना समजावले.आपन शेती ही विस ते तिस वर्षापूर्वी पारंपरिक म्हणजे बैलं जोडी च्या मदतीने करत होतो जसजसा काळात बदल होत गेला तसा आपनही शेती मधे बदल केला.

नक्की वाचा:धक्कादायक! ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना द्यावी लागतेय तब्बल 20 हजार रुपये एकरी मजुरी; ऊस उत्पादक चिंतेत

पण आपन कोठेतरी कमी पडतं आहे हे लक्षात घेऊन राठोड सर यांनी माहीती देत शेती मधे कोणत्या वेळी कोणते उपकरण वापरले पाहिजे जसे पेरणी करताना कोणत्या यंत्रांची पेरणी पद्धती वापरली पाहिजे त्या मुळे वेळ व पैसा वाचवण्यासाठी मदत होईल.जसे बि बि एफ(सरी वरंबा पद्धत) त्याच बरोबर ट्रॅक्टर कल्टिवेशन त्यामधले प्रकार कोणते या सर्व गोष्टी शेतकरी यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितले.

आताच्या काळात मजुराचाअभाव या सर्व गोष्टीचा फरक शेतीवर होते.नवीनतम शेती ला लागणारी औजारे व यंत्रे यांच्या वापराचा फायदा सांगुन शेतकरी बांधवांना  प्रवृत्त करणे आज आवश्यक आहे. या व्यतिरिक्त पीक काढणी पश्चात कामांकरिता सुध्दा शेती मध्ये लागणार्या औजारांची जोड दिली तर पीकाच मशागत करून शेतीमधून मिळणारा फायदा व ज्ञानाची वाढ होते.आपल्या शेतीचा विचार करता शेती पारंपारिक पध्दतीवर व पावसावर अवलंबून त्यामुळे येणाऱ्या काळात कोरडवाहू व बागायती शेतीसाठी आवश्यक असे आधुनिक शेती औजारे व यंत्रे उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा लागणार आहे. थोडक्यात व महत्वाचं म्हणजे आपणास शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी सर्वच स्तरावरून मोठया प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहेत व हि काळाची गरज आहे.

नक्की वाचा:पिन होल बोरर' किडीशी दोन हात करण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर; डाळिंब उत्पादकांना मिळेल का दिलासा?

आपल्या शेती मधे कमी उत्पादन होत आहे व जास्त खर्च हे आजच्या शेतीचे चित्र आहे. शेतीत बदल घडवून आणण्यासाठी अभियांत्रिकीच्या दृष्टीने मोठया प्रमाणात प्रयत्न महत्त्वाचे आहे. आपल्या ग्रामीण भागात शेतकरी हा अल्पभूधारक आहे त्यामुळे नविन यंत्र खरेदी करणे परवडणारे नाही त्या साठी ही उपाय म्हणजे शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती ला लागणारे उपकरणे विकत घेतली जाऊ शकते.स्वयमचलीत कींवा बैलजोडीवरचे नविन पेरणी यंत्र या मुळे शेती काम लवकर होण्यास मदत मिळेल.

शेतीमधे कोणत्याही पद्धतीने फवारणी करणे सोपे जाईल व भविष्यात सुद्धा ही शेती हायटेक होईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही...

धन्यवाद मित्रांनो

*विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल*

*मिलिंद जि गोदे*

*Save the soil all together*

*9423361185*

English Summary: the use of technology in farming is so crucial in crop production Published on: 10 April 2022, 10:19 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters