1. बातम्या

'पिन होल बोरर' किडीशी दोन हात करण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर; डाळिंब उत्पादकांना मिळेल का दिलासा?

डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळ पीक आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये जसं की सातारा,सांगलीतसेच नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड आढळते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
pin hole borer insect attack on pomegranet orchred

pin hole borer insect attack on pomegranet orchred

डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळ पीक आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये जसं की सातारा,सांगलीतसेच नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड आढळते.

परंतु मागील काही वर्षांपासून तेल्या रोगाने थैमान घातल्याने त्यासोबतच मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे बहुसंख्य डाळिंब बागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्या. कारण तेल्या रोग म्हटले म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे औषध उपचार शक्य नाहीत. त्यामुळे डाळींबबागा काढण्याशिवाय  शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी नवीन डाळिंब बागांचे लागवड केली. परंतु तेल्या आणि मर रोग तर आहेच परंतु आत्ता पिन होल बोरर या किडीपासून डाळिंब बागांचे अतोनात नुकसान होत असून हजारो हेक्‍टरवरील डाळिंब बागा शेतकरी काढून टाकत आहेत. यामधून ज्या बागाअजून सुरक्षित आहेत त्या वाचण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पिन होल बोरर  किडीपासून डाळिंब बागा वाचाव्या त्यासाठी सांगली जिल्ह्यातील आटपाडी कृषी विभागाने कंबर कसली असून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उपाययोजना करीत आहेत.

नक्की वाचा:कौतुकास्पद ! भारताचा कृषी क्षेत्रात नवा विक्रम; बातमी वाचून तुम्हांलाही वाटेल अभिमान

कृषी विभागाचे कर्मचारी गावागावात जाऊन या रोगापासून बागा वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यासाठी फवारणी तसेच विविध रसायनांचे ड्रेचिंग आणि पेस्ट लावण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवत असूनशेतकऱ्यांना देखील त्या बाबतीत मार्गदर्शन करीत आहेत. या विभागांमध्ये पिन होल बोरर आणि मर दोन रोगांनी धुमाकूळ घातला असून हजारो हेक्टर डाळिंब बागा उद्ध्वस्त झाले आहेत

या किडी पासून डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना याबाबतीत मदत आणि मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आटपाडी तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी पोपट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायकांची एक टीम प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत व त्यासंबंधी मार्गदर्शन करीत आहेत.

 काय आहे पिन होल बोरर किड?

सध्याच्या काळात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही कीड मोठी डोकेदुखी ठरत आहे.या किडीचे मूळ जन्मस्थान ऑस्ट्रेलिया आहे. अवकाळी किंवा उशिरा येणार्‍या पावसाने ही कीड जास्त फोफावते असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा ही कीड बाहेर येते त्यातच पुन्हा उशिरा पाऊस सुरू झाला तर जास्त प्रमाणात क्रियाशील होते. या किडीचे सर्वात घातक वैशिष्ट्य म्हणजे, ही कीड अतिशय छोटे होल पाडून झाडाच्या खोड आतून पोखरत असते त्यामुळे ते डोळ्यांना दिसून येत नाही.

नक्की वाचा:खूप छान..! उन्हापासून बचाव करण्यासाठी केले हटके नियोजन; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

जेव्हा झाड सुकायला लागते किंवा फांदी मरते तेव्हा आपल्याला समजते की आपल्या प्लॉटवर पिन होल बोरर चा अटॅक झाला आहे. तोपर्यंत ही कीड पूर्ण बागेवर पसरलेली असते. त्यामध्ये महत्त्वाची बाब अशी की डाळिंबाचा भाग जर स्वच्छ ठेवला असेल, खोडावर जास्त फुटवे नसतील  आणि खोड फवारणी योग्य वेळी झाली असेल तर अशा प्लॉटवरया किडीचा प्रादुर्भाव कमीत कमी असतो असे जाणवते. खोड पोखरून ही कीड आता राहते व आत विष्ठा टाकते. यामधून एक घातक बुरशी तयार होते ते सुद्धा तितकीच डाळिंबासाठी उपद्रवी असते.

English Summary: krushi vibhag aatpadi get more effort to prevention from pomegranet orchred Published on: 10 April 2022, 01:41 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters