1. कृषीपीडिया

कृषि निविष्ठांची गाडी रुळावर यावी.... कारण

आजमितीस शेतीतून पिकांचे उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृषी निविष्ठांसाठी शेतकरी

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कृषि निविष्ठांची गाडी रुळावर यावी.... कारण

कृषि निविष्ठांची गाडी रुळावर यावी.... कारण

आजमितीस शेतीतून पिकांचे उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृषी निविष्ठांसाठी शेतकरी परावलंबी असल्याचे चित्रआहे.बियाणे, किटकनाशके, खते यासाठी शेतकऱ्याला कृषी निविष्ठांच्या वितरण प्रणालीवर अवलंबून राहावे लागते.परंतु या वितरण प्रणालीतील असंख्य अडचणी पाहता शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून आर्थिक नुकसान व नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करू इच्छित असलेल्या पिकांच्या वाणांची ऐन पेरणीच्या काळात असणारी अनुपलब्धता, रासायनिक खतांचा

ठराविक विक्रेत्यांद्वारे केला जाणारा कृत्रिम तुडवडा, मागणीच्या काळात निविष्ठांची चढ्या भावांनी विक्री, An artificial squeeze by certain sellers, selling inputs at high prices during periods of demand, त्यांच्या अंतिम गुणवत्तापूर्ण चाचणीतील साशंकता,

सर्व पिकांना मल्टीप्लायरची बीज प्रक्रिया करा आणि फरक पहा

वेळेवर त्यांच्या पुरवठ्यातील होणारी असुसत्रता अशा निर्मितीपासून ते विक्री पर्यंत एक ना अनेक कारणांनी कृषी निविष्ठा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतात. परिणामी अनेक विक्रेत्यांनाही वितरण व्यवस्थेतील अशा त्रुटींमुळे नुकसान होताना दिसते.शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषी निविष्ठांच्या निर्मितीचा खर्च आणि त्यांची प्रत्यक्ष विक्री किंमत यामधील तफावत कमी होणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यांच्या वाढीव किंमतीमुळे शेतकऱ्याच्या एकूण पीक उत्पादन खर्चात वाढ होऊन खिश्याला आर्थिक झळ सोसावी लागते. किटकनाशकांच्या आणि बियाण्यांच्या निर्मिती व विक्री किंमत यांमधील नफेखोरीची चर्चा शेतकरी वर्गामध्ये कायम दिसून येते. निविष्ठांच्या किंमतीत होणारी अनियंत्रित वाढ थांबणे आवश्यक आहे.यावर्षी तर खतांच्या काही अंशी वाढलेल्या किंमतीमुळे खतांच्या विक्रीत घट झाल्याचे कळते.अशावेळी विक्रेत्यांनाही नुकसान सोसावे लागू शकते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्याची गरज असताना खतांची साठेबाजी आणि वाढीव

किमतीत होणारी विक्री, ही कायमचं शेतकऱ्यांची समस्या राहिली आहे.दुसऱ्या बाजूला या निविष्ठांच्या वितरण प्रणालीतील अडचणींमुळेही शेतकऱ्यांची आणि विक्रेत्यांची गैरसोय होताना दिसते. बऱ्याचदा शेतकरी पेरू इच्छित असलेल्या बियाण्याच्या अनुपलब्धतेमुळे किंवा वेळेत त्याचा पुरवठा न झाल्यामुळे शेतकऱ्याचे पीक हंगामाचे नियोजन कोलमडून पडते. ‛निविष्ठांची पर्यायी विक्री' याद्वारेसुद्धा शेतकऱ्याची मोठी फसगत होताना दिसते. जर विक्रेत्याकडे शेतकऱ्याच्या मागणीची निविष्ठा उपलब्ध नसेल तर तो त्यांना पर्यायी निविष्ठा तितकीच प्रभावी असल्याचे आमिष दाखवून

अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्याची फसवणूक करतो. कृषी निविष्ठांमधील अशा अनेक अडचणींमुळे शेतकरी वर्षानुवर्षे आर्थिक शोषणाचा बळी ठरतोय.या समस्यांचा मार्ग निघून वितरण प्रणाली अधिक प्रभावी व मजबूत होणे क्रमप्राप्त आहे. गुणवत्ता नियंत्रक यंत्रणेद्वारे निविष्ठांच्या दर्जाची नियोजित चाचणी व तिची वारंवारता वाढवणे, त्यांचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी उत्पादन व त्याची वाहतूक यामधील समन्वय, संबधित अधिकाऱ्यांद्वारे कृत्रिम टंचाई व भेसळ यासारख्या गोष्टींवर कारवाईची तीव्रता वाढवणे, वाढलेल्या दरांचे नियंत्रण अशा आश्वासक उपाययोजनांची गरज आहे.

 

- योगेश भानुदास पाटील ( कृषी पदवीधर)

मु.पो.अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव

मोबाइल: ७५१७२८७६८५

English Summary: The train of agricultural inputs should come on track.... because Published on: 29 October 2022, 11:37 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters