अकोला दिनांक 18 ऑगस्ट,डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला,कृषी विभाग अकोला,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),अकोला, अकोला जिल्हा कृषी समिती, महाराष्ट्र अॅग्री अॅपेक्स, श्री श्री इन्स्टिट्युट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी ट्रस्ट,आर्ट ऑफ लिव्हिंग,बंगलोर,आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार,अकोला,जय गजानन कृषी मित्र परिवार,अकोला यांच्या विद्यमाने सेंद्रिय शेती कार्यशाळा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
श्री संत गजानन महाराज, श्री श्री रविशंकरजी, भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचा शुभारंभ झाला. जे टी कराळे, विदर्भ समन्वयक, महाराष्ट्र अॅग्री अपेक्स यांनी प्रस्ताविकाद्वारे कार्यशाळेचे उद्देश व श्री श्री रविशंकरजी यांचे संदेशानुसार रसायनमुक्त शेती - विषमुक्त आहार या संकल्पनेतून शेतकÚयांना प्रबोधन व्हावे, सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढावे, शेतकÚयांचा नफा वाढावा, जमीन जिवंत राहावी यासाठी प्रत्येक गावांमध्ये श्री श्री किसान मंचची स्थापना करण्याचे आवाहन केले.He appealed to establish Sri Sri Kisan Manch in every village to keep the land alive.
डॉ. रामकृष्ण मुळे, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र अॅग्री अॅपेक्स, श्री श्री इन्स्टिट्युट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हिंग, बंगलोर व से नि कृषी संचालक महाराष्ट्र राज्य अॅग्री अपेक्सचे सदस्य व कृषी सहसंचालक पुणे डॉ.पांडुरंग शेळके, महाराष्ट्र राज्य समन्वयक जे डी मामगडे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कृषी क्षेत्रातील नैसर्गिक शेतीची संकल्पना, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, प्रमाणीकरण,पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग मार्केटिंग देण्याची प्रक्रिया व वाटचाल विशद केली.
डॉ आदिनाथ पसलावर, प्रमुख शास्त्रज्ञ, डॉ योगेश इंगळे वनस्पती रोगशास्त्रज्ञ, सेंद्रीय संशोधन व प्रशिक्षण केंद्र डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, सेंद्रिय शेती व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले.याप्रसंगी डॉ धनराज उंदीरवाडे संचालक विस्तार शिक्षण डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, श्री जांभरुणकर तालुका कृषी अधिकारी अकोला, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक श्री जगदीश खोलकर, श्री मोहने साहेब कृषीतज्ज्ञ, जय गजानन कृषी मित्र परिवाराचे संजय गाडे, अरुण गावंडे, श्रीकांत पडगिलवार उपस्थित होते
या सोहळ्यामध्ये सेंद्रिय शेती यशस्वीरित्या करणारे प्रगतशील शेतकरी श्री राजेंद्र ताले दिग्रस, श्री कैलास बांगर सिनगाव जि बुलढाणा,कापाशीची एस.डी.पी. ए. पद्धतीने लागवड करून भरघोस उत्पादन घेणारे शेतकरी श्री दिलीप ठाकरे मालवाडा, श्री वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित व दैनिक अॅग्रोवनचे प्रतिनिधी श्री विनोद इंगोले, गोपाल हागे यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आर्ट ऑफ लिव्हींग परिवाराचे व जय गजानन कृषी मित्र परिवाराचे व
महाराष्ट्र अॅग्री अॅपेक्सचे सदस्य सर्वश्री दिलीप बोबडे, विजय शेगोकार, कपिल ठक्कर, देविदास घोरड, सुधीर इंगळे, प्रवीण शिंदे, अॅड कांचन शिंदे, सुनिता तिवारी, पुषा बोचरे, रामकृष्ण डालमिया, दिनेश मूरजानी, गौरव पसारी, प्रशांत पाटकर, रवी कराळे, दिनेश करवते, अनिल गावंडे, श्री श्री किसान मंच विवरा अध्यक्ष दिनेश पर्जा, अभिनंदन पारस्कर, जयेष सदावर्ते, डॉ.संकेत अग्रवाल, उषा शर्मा, अंकित पनपालिया, श्वेता मुरजानी यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र अॅग्री अॅपेक्सचे पातुर तालुका समन्वयक देविदास धोत्रे व सौ वंदना धोत्रे यांनी कुलगुरू महोदय यांचे सेंद्रिय भाजीपाला कीट देऊन स्वागत केले.याप्रसंगी प्रगतशील शेतकरी विजय इंगळे चितलवाडी, मधुकरराव सरप,विठ्ठलराव ठोंबरे, आत्मा अकोल्याचे झामरे साहेब,प्राचार्य सुभाषराव पाथ््राकर, विजय ठाकरे, विनोद क्षिरसागर, घनश्याम बिजवे,डॉ प्रशांत व्यास तसेच अकोला, बुलढाणा, वाशीम,अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्र अॅग्रो अॅपेक्सचे सदस्य, आर्ट
ऑफ लिव्हिंगचे टीचर, अॅग्री टीचर, प्रगतशील शेतकरी बंधू- भगिनी उपस्थित होते. दै.कृषिकोन्नती संपादक सूर्यकांत भारतिय उपस्थित होते.यानिमित्ताने सेंद्रिय निविष्ठा उत्पादक कंपनीचे टॉल्स प्रदर्शनीचे प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले व अधिकारी मंडळीने मार्गदर्शन केले.रोहिदास भोयर कृषी विस्तार अधिकारी यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन तर जय गजानन मित्र कृषी मित्र परिवाराचे मार्गदर्शक गिरीशजी नानोटी यांनी आभार प्रदर्शन केले.
Share your comments