1. कृषीपीडिया

माती सुपीकतेचा जवळचा मित्र कंपोस्ट खत पद्धती होय

आपल्या सेवेत हा लेख तयार केला आहे वाचाल व अभिप्राय पाठवा शेती मधला सुपीकतेचा दुवा म्हणजे कंपोस्ट खत

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
माती सुपीकतेचा जवळचा मित्र  कंपोस्ट खत पद्धती होय

माती सुपीकतेचा जवळचा मित्र कंपोस्ट खत पद्धती होय

आपल्या सेवेत हा लेख तयार केला आहे वाचाल व अभिप्राय पाठवा शेती मधला सुपीकतेचा दुवा म्हणजे कंपोस्ट खत हे नुसता कुजलेला पालापाचोळा नसून त्यात विविध प्रकारचे वनस्पतीतत्व व प्राणीजन्य घटक हे देखील महत्वाचे असतात.आपल्या साठी थोडं जाणुन घेणे महत्त्वाचे आहे कंपोस्ट खत म्हणजे गावातील आणि शहरी भागात निर्माण झालेल्या विविध सेंद्रीय पदार्थाच्या साहाय्याने कुजलेले व सूक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत म्हणजे साध्या भाषेत सांगायचे झाले तर कंपोस्ट खत आहे.मला हे लक्षात घेऊन शेती विषयावर सांगायचे होते. या बाबत कंपोस्ट खत काही पद्धती प्रचलित आहे

इंदोर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत,नॅडेप पद्धत, वर्धा पद्धती व एस9 पद्धत या आहे.मला या पद्धती सेंद्रिय शेती मध्ये कराव्या लागल्या मजेशिर गोष्ट म्हणजे या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी सर्व कुजलेले खत हे एकसारखेच असते.आपण आपल्या शेती मधे अतोनात रासायनिक खताचा वापर केला.आपल्या पुर्वी आपला शेतकरी वर्ग शेणखत, कंपोस्ट खत,पिकांची फेरपालट यांच्याद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवायचे.आता तो काळानुसार बदलत गेला आणि भारतात हरितक्रांतीच वादळ आलं.आपल्याकडे शेती मधलं तंत्रज्ञान वाढल्याने आपला शेतकरी बांधव रासायनिक खतांचा व रसायनांचा वापर सर्वाधिक करू लागला 

त्याचा परिणाम थेट पिकावर आणि जमिनीवर दिसू लागला.त्याच बरोबर यामधे हे संकट शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्यावर आले व शेती मध्ये आपला मित्र गांडूळाचे अस्तित्वच धोक्यात आले. आपल्या माहीत असेल नसेल पण काही वनस्पती सेंद्रीय घटक निर्माण करतात. शेती मधले झाडांची पाने किंवा पाहाळातले झाडं झुळपं हे वारा व वादळाने झाडे मोडून जमिनीवर पडतात काही जनावरे वनस्पती खातात आणि त्यांच्या विष्टेतून सेंद्रीय पदार्थ बाहेर पडतात. जेव्हा मासांहारी जिव शाकाहारी जिवांना खातात तेव्हा त्यांचे विष्ठेत सेंद्रीय पदार्थ हे असतात.आपन जेव्हा शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिसळतो त्याच बरोबर मेलेल्या मुळया जमिनीत कुजतात.गुरे,ढोरं शेळया-मेंढया ह्या जंगलात चरतात तेंव्हा त्यांचे शेण व लेंडया जमिनीवर पडतात. शेणकिडे कींवा ईतर किटक शेणाला आपल्या बिळात नेतात व शेण खातात त्याचं बरोबर जमिनीत राहणारे कीटक असो की लहान प्राणी अथवा जिवाणू जेव्हा हे मरण पावतात तेंव्हा त्यांचे शरीरातील सेंद्रीय घटक जमिनीत मिसळतात.अशाप्रकारे जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजविण्याच्या विविध अवस्था असतात या अवस्थेला निसर्गाची सायकल म्हणतात. सेंद्रीय पदार्थ ओळखता येते पण ते पुर्णपणे कुजल्यानंतर त्याचा मूळ आकार राहतच नाही तेंव्हा त्याला प्रक्रियेला ह्युमस असे म्हणतात.

आता पाहू कंपोस्ट खत शेतीमधे कोणत्या तर्हेने द्यावे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.आपण जर आपल्या शेतावर वेगवेगळ्या पद्धतीने कंपोस्ट खत तयार केलेल तयार असल्यास दरवर्षी प्रती हेक्टर 2ट्राली ते 4 ट्राली खत पेरणीच्या १५ दिवस अगोदर पसरून घ्यावे. किंवा पेरणी झाल्यावर शेतामध्ये फेकणे महत्वाचं आहे अशा या पद्धतीने तयार केलेल्या कंपोस्ट खताची उपलब्धता शेती ला होते

हे प्रथम जमिनीत पडेल व त्यानंतर बियांची पेरणी होईल आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा आपन कंपोस्ट चां बेड किंवा टाक्यामधलं खत काढल्यानंतर ते मोकळ्या जागेत ठेवने चुकिचे होईल.कंपोस्ट खत प्रत्यक्ष देण्यापूर्वी काही दिवस साठवून ठेवायचे असल्यास ढीग लावून व त्यावर गवताचे किंवा हिरवी नेट या वस्तुचे आच्छादन टाकून ठेवावे. मधून काही ठराविक वेळेत पाणी शिंपडावे. त्यामुळे आर्द्रता( moisture)कायम राहण्यास मदत होइल.

सेंद्रीयचा घटक कार्बनच्या अनेक संयुगाने बनलेले असतात. खनिजतत्वा पासुन तयार होते. अशा जमिनीला सेंद्रीय जमीन म्हणतात. जमिनीमधील सेंद्रीय पदार्थ कुजण्याची क्रिया सतत चालू असते जमिनीच्या उत्पादन क्षमतेत सेंद्रीय पदार्थांचे कार्य सुपीक जमीन बनविण्यात सेंद्रीय पदार्थाचा सहभाग असतो. कारण त्यामधून हळूहळू अन्नद्रव्ये पिकांना मिळत असतात. जिवाणुंमुळेच सेंद्रीय पदार्थ कुजण्याची हळूहळू क्रिया होते, तेव्हा त्यातील अन्नद्रव्ये पिकासाठी तयार होतात.

सेंद्रीय पदार्थामधे असलेलं खनिज हळूहळू जमिनीत चिकण कणांचे प्रमाण जास्त वाढवतं जमिनीची मशागत करणे अवघड होते. अशा जमिनीत पाणी मुरण्याची क्रिया ची हळूहळू होते, त्यामुळे बरेचसे पाणी शेती मधुनच वाहून जाते.यामुळे जमिनीत हवा खेळती रहात नाही आपन अश्या भारी जमिनीत सेंद्रीय पदार्थ मिसळल्यास ती जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते व मशागत करणे सोपे जाते.

जमीन भुसभुशीत झाल्यावर पाणी मुरते, पाणी वाहून जात नाही. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते, हवा खेळती राहते. जमिनीच्या पृष्ठभागावर चोपून माती सारखा पोपडा तयार होत नसल्याने पेरलेल्या बियाण्याची उगवण चांगली होते त्याच बरोबर त्या शेतात किटकाचा व बुरशी चां प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो.सांगण्याचे तात्पर्य हेच की जमिन सुपिक जर असली तर कोणतेही पीक कोणत्याही हंगामात घेतले जाऊ शकते.

 

मिलिंद जि गोदे

 9423361185

English Summary: The link to soil fertility is the compost manure method Published on: 20 April 2022, 04:48 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters