पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा सर्रासपणे अति वापर होताना दिसत आहे. 20 ते 30 वर्षापूर्वी एक गोणी रासायनिक खत टाकून मिळणारा परिणाम मिळायला आपल्याला कमीत कमी दोन ते तीन गोणी रासायनिक खत आता लागते. याचे कारण काय?तत्पूर्वी आपल्याघरीभरपूर गाई, मशी असायच्या.
त्यांचे शेण काढून साठवले जायचे तसेच घरातील चुलीतील राख शेतात टाकली जायची इतकेच नाही तर घरातला प्राणी मेला तर त्याला शेतात पुरायचे. या सगळ्या मुळे जमिनीत जिवाणूंची संख्या भरपूर असायची.
परंतु कालांतराने सेंद्रिय खतांचे प्रमाण कमी कमी करत गेल्याने काही जणांनी सेंद्रिय खतांचा वापर पूर्ण बंद केला. त्यामुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या कमी होत गेली व रासायनिक खताला मिळणारा रिजल्ट कमी कमी होत गेला. आपल्या खतात जिवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. हे जिवाणू जमिनीत दिलेल्या रासायनिक खताला एकत्र करून पिकाला पुरवतात. यामुळेच न वापरले जाणारे रासायनिक खत वापरले जाते.
युरियाच्या गोणी चा विचार केला तर त्यावर 46:00:00 लिहिले असते. याचा अर्थ एका गोणी मध्ये 46 टक्के नत्र असते. स्फुरद व पालाश 0 टक्के आहे. म्हणजे 50 किलोच्या गोणीमध्ये 23 किलो नत्र असते.हा युरिया टाकल्यानंतर त्यातला जवळपास 12 ते 14 किलो युरिया पटकन वापरला जातो उरलेला युरिया जमिनीत पुरेसे जिवाणू नसल्याकारणाने वाया जातो व पिकाला वापरता येत नाही. पहिल्या पाच ते सात दिवसात पीक जोमाने वाढते व नंतर वाढ खुंटली की काय अशी शंका येते. त्यामुळे आपण वाढीसाठी महागडी मायक्रोन्यूट्रिएंट वापरतो.
परंतु त्यामागे नेमके कारण असते की टाकलेले खत संपूर्णपणे वापरले न गेल्याने आपल्याला वाटते की पिकाची वाढ खुंटलीय.सेंद्रिय खत वापरल्यास रासायनिक खत पिकाला योग्य प्रमाणात व भरपूर काळ खायला घातले जाते. सेंद्रिय खतामुळे आपल्या शेतात स्वतःचे नत्र,स्फुरदव पालाश असल्यामुळे पिकाला नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात खायला मिळते यामुळे वाढ होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते.जमिनीमध्ये जीवाणूचा संख्या वाढवण्यासाठी सेंद्रिय,जैविक, ऑरगॅनिक शिवाय पर्याय नाही.
Share your comments