1. कृषीपीडिया

अडचणीत असलेल्या खरीप पिकांची घ्या अशा प्रकारे काळजी

किरण भेकणे
किरण भेकणे
cotton

cotton

शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणी पासून ते काढणी पर्यंत नेहमी अनेक संकटांना सामना करावा लागतो. जे की पीक शेवटच्या टप्यात असते आणि शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे अनेक संकटांना सामना करावा लागतो. सध्या पाहायला गेले तर राज्यात अतिवृष्टी काही भागात झाली असल्याने तेथील भागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांना बुरशी चा प्रादुर्भाव झाला आहे.

बुरशी रोगाचा धोका निर्माण झालेला आहे:

शेतकऱ्यांना(farmer) पुन्हा पेरण्या कराव्या लागल्या आहेत आणि त्यामध्ये जी पिकांची खुंटलेली वाढ असो तसेच करप्या रोग आणि उंट अळी अशा सर्व बिकट परिस्थितीना सामना करत करत शेतकऱ्याचे हाल खूप वाईट सुरू आहेत. या संकटापासून दूर व्हायचे असल्याने शेतकरी अत्ता कृषी (farming)विभागाच्या सल्याची वाट बघत आहे.मागील चार दिवसापासून लगातर सुरू असलेला मुसळधार पावसाने सर्वत्र शेतामध्ये पाणी साचून राहिलेले आहे आणि त्यात पीक असल्याने सगळ्या पिकात पाणी पाणी झाले आहे आणि या पाण्यात पीक  असल्याने   बुरशी रोगाचा धोका निर्माण झालेला आहे.या सर्व परिस्थिती शेतकऱ्याला काय सुचत नाहीये आणि हा सर्व धोका लक्षात कृषी विभागाच्या अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांना असा सल्ला दिला  आहे  की लवकरात लवकर शेतामध्ये जे पाणी साचले आहे ते बाहेर काढावे ज्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना पण पिकाचे सरंक्षण होईल आणि त्यामधून चार पैसे तर शेतकऱ्यांच्या पदरात पडतील.

हेही वाचा:मातीविना शेती! माहितीय का तुम्हाला हायड्रोपोनिक्स शेती? नाही तर मग जाणुन घ्या

उस्मानाबाद तसेच बीड मधील कृषी विभाकाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आलेले आहे. मराठवाडा मध्ये यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड केलेली आहे त्यामुळे तेथील शेतकरी वर्गाची अपेक्षा होती की यावेळी चांगल्या प्रकारे उत्पादन भेटेल मात्र अनियमित पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे बिघडलेले आहे.

अशा प्रकारे घ्या सोयाबीन पिकाची काळजी:

खरीप हंगामातील सर्वात महत्वाचे पीक हे सोयाबीन ला मानले जाते. गतवर्षी शेतकरी वर्गाला या पिकातून हजारो रुपयांचा फायदा झालेला आहे, परंतु यावेळी  काढणीच्या वेळेला  पावसाने जोरदार आपले आगमन केले आणि सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडू लागली आहेत. जे शेतकऱ्यांना बुरशी ची लक्षणे आढळून आली तर.१० लिटर पाण्यात टेब्युकोनीझोल व सल्फर हे २५ ग्राम किंवा टेब्युकोनीझोल २५ मिली चा वापर करावा.

तुरीचे संरक्षण:

शेतामध्ये या परिस्थितीत तुरीच्या पिकावर मर रोग चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे जी रोपे मरगळलेली तो रोपे लगेच काढून टाकावी त्यामुळे तुम्हाला उत्पादन भेटेल मात्र योग्य वेळेत तुम्हाला ही रोपे काढून टाकावी लागतील.

कापूस:

या वातावरणात कापसाचे जे मूळ असते ते मुळ कुजवण्याचा प्रयत्न ही अळी करत असते, यासाठी तुम्हाला कॅापर आँक्सिक्लोराईड २५ ग्रॅम तसेच युरिया २०० ग्रॅम आणि या बरोबर पंधरा पोटँश 100 ग्रॅम प्रमाणात लागेल तसेच लिटर पाण्यात मिश्रण करून फवारणी करावी.

कांद्याची पात पिवळी पडली तर:

कमी नत्र आणि अतिवृष्टी झाली असल्याने कांद्याच्या जी पात असते त्याची पाने पिवळी पडतात. त्यासाठी तुम्हाला प्रति १० लिटर पाण्यात १०० ग्रॅम युरिया चे मिश्रण करून त्याची फवारणी करावी लागेल.

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters