महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरू आहे. अशा वातावरणात आपल्या पिकांची योग्य ती काळजी घेतली नाही तर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.सिस्टेमिक (आंतरप्रवाही) बुरशीनाशकापेक्षा कॉन्टॅक्ट (स्पर्शजन्य) बुरशीनाशकाचा वापर करावा. याचे कारण म्हणजे अशा वातावरणात पर्णरंध्रे (stomata) शक्यतो बंद असतात आणि आपण फवारत असलेले औषध झाडाच्या आत प्रवेश करू शकत नाही. जर आंतरप्रवाही बुरशीनाशक झाडातच जाऊ शकत नाही तर ते प्रभावीपणे काम करू शकणार नाही. परिणामी आपले पैसे अक्षरशः वाया जातील.
म्हणूनच या वातावरणात स्पर्शजन्य बुरशीनाशके व कीटकनाशके वापरल्यास फायदेशीर ठरते. आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशके वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. त्याबद्दल आपण येत्या काही दिवसांत स्वतंत्र पोस्टमधून चर्चा करू. मात्र सध्या तरी वरील मुद्दा लक्षात घेऊन काम करायला हवे.तसेच, या दिवसांमध्ये पिकाची वाढ वेगाने होत असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण म्हणजे सूर्यप्रकाश कमी असतो आणि तो शोधण्यासाठी झाड स्वतःची उंची वाढवते.
जर आंतरप्रवाही बुरशीनाशक झाडातच जाऊ शकत नाही तर ते प्रभावीपणे काम करू शकणार नाही. परिणामी आपले पैसे अक्षरशः वाया जातील. म्हणूनच या वातावरणात स्पर्शजन्य बुरशीनाशके व कीटकनाशके वापरल्यास फायदेशीर ठरते. आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशके वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. त्याबद्दल आपण येत्या काही दिवसांत स्वतंत्र पोस्टमधून चर्चा करू. मात्र सध्या तरी वरील मुद्दा लक्षात घेऊन काम करायला हवे.
साधे उदाहरण द्यायचे झाल्यास बर्फाळ प्रदेशात झाडांची उंची ही इतर कोणत्याही प्रदेशातील झाडांपेक्षा जास्त असते. इथेही तेच कारण, झाडे सूर्यप्रकाश शोधत उंच उंच होत जातात. मात्र ही जास्तीची उंची आपल्या पिकांसाठी तितकीशी फायदेशीर नाही. हे आटोक्यात ठेवण्यासाठी पिकाचा नायट्रोजन कमी करावा अथवा परिस्थितीनुसार पूर्णपणे थांबवावा. तसेच पाणीदेखील गरजेनुसारच द्यावे. कारण झाडांना पाण्यातून देखील नायट्रोजन मिळत असतो आणि गरजेनुसार पाणी दिल्यास जास्तीचा नायट्रोजन आपल्याला टाळता येईल.
Share your comments