जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई व विना अट पिक विमा द्यावा अशी मागणी स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांनी उपविभागिय अधिकारी यांच्या मार्फत मा.जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे. यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे. वेळोवेळी पडलेला मुसळधार पाऊसामुळे शेकडो एकर जमिनीवरील सोंगून ठेवलेले सोयाबीन पुर्णपणे पाण्याखाली गेले, कापूस,तुर,
ज्वारी, उडिद,मुंग इत्यादी पिकासह प्रचंड प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.A huge amount of crops including Jowar, Udid, Moong etc. have been damaged.पंरतु लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यावर चालनारे प्रशासनाने शेतकऱ्यांना पंचनाम्याचे गाजर दाखवून नुकसान होऊनही जाणिवपूर्वक शासनाच्या मदतिपासुन हजारो शेतकऱ्यांना वंचित ठेवत आहेत. त्यामुळे जळगाव व संग्रामपुर तालुक्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारामय होणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकरिता सरकारने बुलढाणा जिल्हा ओला
दुष्काळ जाहीर करुन सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नूकसान भरपाईची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. व पिक विमा कंपनीने विना अट पिक-विमा मंजुर करून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा. अशी मागणी स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांनी आज जिल्हाअधिकारी यांच्या कडे आज निवेदनातून केली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्णायक भूमिका घेऊन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्यास टाळाटाळ केली तर रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२२
रोजी दिवाळीच्या दिवशी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह हजारोंच्या संख्येने सर्व शेतकरी, जळगाव तहसील कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातुन दिला आहे. यावेळी स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष सय्यद बाहोद्दीन, तालुका अध्यक्ष अंकीत दाभाडे, तेजराव लोने, मोहन गावंडे, विलास इंगळे, गोपाल वायझोडे, सैयद अदणान, सुनिल इंगळे,रोशन बान्हेरकर, शे. रेहान, शे. शाहीर शे.मजिद, आकाश म्हसाळ, यांच्या सह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Share your comments