1. कृषीपीडिया

आगामी उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग पिकात बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा

शेतकरी बंधूंनो बीज प्रक्रिया किड व रोग प्रतिबंधक करिता तसेच अन्नद्रव्य उपलब्धते करता रामबाण उपाय आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग पिकात बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा

उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग पिकात बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा

शेतकरी बंधूंनो बीज प्रक्रिया किड व रोग प्रतिबंधक करिता तसेच अन्नद्रव्य उपलब्धते करता रामबाण उपाय आहे. म्हणून बीज प्रक्रियेला कमी लेखून टाळू नका तसेच पूर्वनियोजन करून आगामी उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग पिकात खाली निर्देशित बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा. या बीज प्रक्रियेविषयी विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

(A) बीज प्रक्रिया म्हणजे काय?

शेतकरी बंधूंनो पेरणीपूर्वी एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवून विशेषता अन्नद्रव्य उपलब्धतेत वाढ करणे, पिकामध्ये कीड व रोग प्रतिबंध करणे यासारखा महत्त्वाचा उद्देश ठेवून केलेली जैविक खताची, जैविक बुरशीनाशकाची किंवा रासायनिक बुरशीनाशकाची किंवा किटकनाशकाची बियाण्याला शिफारशीप्रमाणे पेरणीपूर्वी केलेली प्रक्रिया म्हणजे बीजप्रक्रिया होय.

(B) पिकात बीज प्रक्रिया केल्यामुळे कोणते महत्त्वाचे फायदे होतात?

(१) उन्हाळी भुईमूग सारख्या पिकात संबंधित पिकात शिफारशीत रायझोबियम या जैविक खताची बीजप्रक्रिया केल्यास हवेतील नत्र स्थिर होतो व नत्राची उपलब्धता होते व रासायनिक खतातून द्यावयाच्या नत्राच्या मात्रेत कपात करता येते. 

(२) शेतकरी बंधूंनो पीएसबी या जिवाणू संवर्धकाच्या बीजप्रक्रियेमुळे उन्हाळी भुईमूग यासारख्या पिकात जमिनीतील रासायनिक खताच्या रूपात दिलेला स्फुरद विरघळून पिकाला मिळवून देण्याचे काम केलं जातं.

(३) शेतकरी बंधुंनो शिफारशीप्रमाणे व लेबल क्‍लेम प्रमाणे प्रत्येक पिकात संबंधितत् रासायनिक बुरशीनाशक व कीटकनाशक यांची प्रक्रिया केली तर शिफारशीप्रमाणे संबंधित पिकातील संबंधित कीड रोगाचा प्रतिबंध मिळतो व नंतर होणारा रासायनिक कीडनाशकाचा वापर कमी होऊन उत्पादनखर्चात कपात होते व पर्यावरण निष्ठ पीक संरक्षण करता येते. बऱ्याच रोगात बऱ्याच पिकात जमिनीतून प्रादुर्भाव करणाऱ्या बुरशीजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी केव्हाही बीजप्रक्रिया हाच रामबाण उपाय असतो व नंतर रासायनिक बुरशीनाशकाच्या फवारण्या म्हणजे साप गेल्यानंतर काठी मारणे होय.

(४) याव्यतिरिक्त काही पिकात उगवण चांगली करणे पेरणी सुलभ करणे किंवा बियाण्याची सुप्तावस्था कमी करणे या व इतर कारणासाठी बीजप्रक्रिया केली जाते.

(C) उन्हाळी भुईमूग पिकात आगामी उन्हाळी हंगामात कोणत्या जैविक खताची व किती प्रमाणात बीजप्रक्रिया करावी?

(१) उन्हाळी भुईमूग या पिकात रायझोबियम हे जिवाणू खत व पीएसबी हे जिवाणू खत प्रत्येकी अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास या प्रमाणात किंवा या खताची उपलब्धता द्रवरूप स्वरूपात असेल तर रायझोबियम व पीएसबी प्रत्येकी 250 ते 300 मिली द्रवरूप प्रति 50 किलो बियाण्यास म्हणजेच 5 ते 6 मिली प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात प्रक्रिया करून घ्यावी. ही बीजप्रक्रिया केली तरच हवेतील नत्राचे स्थिरीकरण होते व स्फुरदाची उपलब्धता वाढते. ही खत बीज प्रक्रियेच्या रुपात आगामी उन्हाळी हंगामात आपण वापरली नाही तर वेळ निघून गेल्यावर इतर कोणत्याही रासायनिक खतातून किंवा द्रवरूप फवारणीच्या खतातून या जैविक खताचे मिळणारे फायदे हे संबंधित पिकात मिळणार नाहीत.

(D) आगामी उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग या पिकात कोणत्या रासायनिक बुरशीनाशकाची, जैविक बुरशीनाशकाची व कशा प्रमाणात बीजप्रक्रिया करावी?

(१) शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग या पिकावरील मर मूळकूज , खोडकुज , या रोगाचा प्रतिबंध करण्याकरिता प्रथम Carboxin 37.5 % + Thiram 37.5 % या संयुक्त रासायनिक बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात व ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर अर्ध्या तासाने ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. 

(2) उन्हाळी भुईमूग या पिकात रोपातील मर या रोगाचा प्रतिबंध करण्याकरिता ट्रायकोडर्मा व्हेरीडी या जैविक बुरशीनाशकाचा साधारणता अडीच किलो प्रति हेक्टर चांगल्या कुजलेल्या 100 किलो शेणखतात मिश्रण करून जमिनीत ओल असताना पेरणीपूर्व वापर जमिनीत वापर करून चांगले जमिनीत मिसळून पेरणी केल्यास केल्यास भुईमूग पिकातील रोपातील मर रोगाचा प्रतिबंध मिळण्यास मदत होते.

(E) उन्हाळी भुईमूग या पिकात बीज प्रक्रिया करताना कोणती पद्धत अवलंबावी व कोणती काळजी घ्यावी?

(१) शेतकरी बंधूंनी बीज प्रक्रिया करताना रासायनिक बुरशीनाशके कीटकनाशक यांची बीज प्रक्रिया प्रथम करावी व नंतर अर्ध्या तासानंतर जैविक खत व जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. रासायनिक निविष्ठा व जैविक निविष्ठा यांच्या बीजप्रक्रिया एकत्र मिश्रण करून करू नये व त्यांचा क्रम प्रथम रासायनिक बीजप्रक्रिया व नंतर जैविक निविष्ठांची बीज प्रक्रिया असाच ठेवावा.

(२) शेतकरी बंधूंनो भुईमूग या पिकात रासायनिक व जैविक या दोन्ही निविष्ठा ची बीज प्रक्रिया करतांना भुईमूग बियाण्याची साल निघणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. याकरिता शेतकरी बांधवांनी भुईमुगाचे साधारणता पाच किलो बियाणे पॉलीथीन बॅग मध्ये टाकून प्रथम निर्देशीत प्रमाणात म्हणजे साधारणत पाच किलो बियाण्यास 15 ग्रॅम वर निर्देशित शिफारशीत रासायनिक बुरशीनाशक या पॉलिथिन बॅगमध्ये टाकून नंतर हलक्या हाताने बॅग उलट-सुलट करावी म्हणजे सर्व बियाण्यास हे रासायनिक बुरशीनाशक बियाला लागेल. या पद्धतीने संपूर्ण रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर याच पद्धतीने अर्ध्या तासानंतर जैविक खते व बुरशीनाशक म्हणजे ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची वर निर्देशित प्रमाणात स्वतंत्र बीज प्रक्रिया करावी. जैविक खते, रासायनिक बुरशीनाशके व जैविक बुरशीनाशके यांची बीज प्रक्रिया करताना कोणत्याही परिस्थितीत भुईमूग बियाण्याची साल निघणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

(२) शेतकरी बंधूंनो घरचे घरी बीज प्रक्रिया करताना हातात हॅन्ड ग्लोज किंवा पॉलिथिन पिशवी हॅन्ड ग्लोज म्हणून वापरावी बीज प्रक्रिया करताना 100 ग्राम गूळ एक लिटर पाणी या प्रमाणात पाणी कोमट करून थंड होऊ द्यावे व बीज प्रक्रिया करताना या गुळाच्या पाण्याचा हवा तेवढाच किंचित शिडकावा या बियाण्यावर निष्ठा चिटकून ठेवाव्या म्हणून देऊ शकता तू कोणत्याही परिस्थितीत भुईमूग बियाणे ओलेगच होणार नाही तसेच त्याची साल निघणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

(३) भुईमूग पिकात बीज प्रक्रिया करताना विशेष काळजी घ्यावी व बियाला हाताने चोळू नये व ओले गच करू नये तसेच बियाण्याची टरफले निघणार नाहीत याची काळजी घ्यावी.

(४) शेतकरी बंधूंनो बीज प्रक्रिया करण्यापूर्वी कृषी विद्यापीठ यांच्या शिफारशी यांच्या शिफारशी तसेच लेबल क्‍लेम शिफारशी याची शहानिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच लेबल क्‍लेम शिफारशीत असलेल्या निविष्ठांचा वापर बीजप्रक्रियेसाठी करावा.

(E) जैविक खते जैविक बुरशीनाशके कुठे उपलब्ध होतात?

शेतकरी बंधूंनो जैविक खत,जैविक बुरशीनाशक व जैविक कीटकनाशक यांच्या उपलब्धतेसाठी सर्वप्रथम कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्या प्रयोग शाळेत संपर्क साधावा त्यांच्याकडे उपलब्धतेनुसार खरेदी करताना अशा प्रकारच्या निविष्ठा खरेदी करताना प्राधान्य द्यावे. शेतकरी बंधूंनो याव्यतिरिक्त भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या इतर मान्यताप्राप्त कंपन्या किंवा अधिकृत विक्रेते व अधिकृत उत्पादक यांच्याकडूनच जैविक निविष्ठा खरेदी कराव्यात.

 शेतकरी बंधूंनो आगामी उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग पिकात शिफारशीत बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा व पुढे रासायनिक निविष्ठावर होणारा अनावश्यक खर्च टाळा व पर्यावरणनिष्ट अन्नद्रव्य व रसायनाचे व्यवस्थापन करून उत्पादन खर्चात कपात करा 

 

राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

English Summary: Summer groundnut seed treatment and drilling Published on: 07 January 2022, 12:37 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters